घरठाणेगौरी पाडा तलावातील ६५ कासवांच्या मृत्यूचा अहवाल स्पष्ट

गौरी पाडा तलावातील ६५ कासवांच्या मृत्यूचा अहवाल स्पष्ट

Subscribe

बॅक्टेरियाने मृत्यू झाल्याची माहिती

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावातील सुमारे ६५ कासवांचा मृत्यू झाला होता.यातील दहा कासवांना वाचवण्यात आले होते. दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. या कासवांचा मृत्यू बॅक्टेरियामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर केडीएमसी आणि वनखातेही सक्रीय झाले आहे.

गौरीपाड्यातील कर्नाळा देवी मंदिर लगत प्राचीन तलाव आहे. या तलावाचे सुशोभीकरणाचे काम रेंगाळलेले आहे. तलावात २३ आणि २४ जानेवारी रोजी अवघ्या दोन दिवसात सुमारे ६५ कासव मृत पावली होती. तीन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील बरेली येथील तपासणी केन्द्राकडून वन खात्यास प्राप्त झालेल्या अवहालात बॅक्टेरियामुळे कासवांचे यकृताची हानी झाल्याने कासवांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कासवांना कोविड विषाणूची बाधा झाली नसल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे. या बाबत कल्याण वन अधिकारी आर एन चन्ने यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली मनपाशी पत्रव्यवहार करून तलावातील पाण्याचे प्रदुषण होणार नाही, याकडे लक्ष देण्याबाबत सूचना करणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -