घरठाणेनळपाडा,सुभाषनगर रहिवाशांना मिळणार अद्ययावत व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल, शाळा, उद्यान

नळपाडा,सुभाषनगर रहिवाशांना मिळणार अद्ययावत व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल, शाळा, उद्यान

Subscribe

निधी उपलब्ध करून देण्याचे आमदारांचे आश्वासन

ठाणे महानगरपालिका हद्दीतील नळपाडा, सुभाषनगर परिसरातील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून नागरी सुविधा देण्याबाबतची मागणी करत होते. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. त्यामुळे या राहिवासींना आता व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल, शाळा व उद्यान लवकरच उपलब्ध होणार असून त्याच्यासाठी लागणार निधी हा महापालिका, शासनातर्फे किंवा आपल्या आमदार निधी देणार असल्याचे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक काढत त्याबाबत स्पष्ट केले आहे.

आमदार सरनाईक यांच्याकडे स्थानिक नागरिकांकडून याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकारी व स्थानिक रहिवाश्यांना बरोबर घेऊन शुक्रवारी आमदार सरनाईक यांनी पाहणी केली असता, निळकंठ पाम या विकासकाच्या सुविधा भुखंडावर बांधण्यात आलेल्या मल्टीपर्पज इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर या परिसरातील गोरगरीब नागरिकांसाठी बँक्वेट हॉल त्याचबरोबर तळमजल्यावर या परिसरातील तरूणांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा तसेच शेजारील असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या राखीव भुखंडावर इंग्रजी माध्यमाची शाळा व निळकंठ पामच्या विकासकाने दिलेल्या ३७०० चौ.मी.च्या भुखंडावर अद्ययावत उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

- Advertisement -

याचदरम्यान महानगरपालिकेच्या आरक्षित असलेल्या भुखंडावर होत असलेले अतिक्रमण काढून त्या भुखंडाला कुंपन भिंत घालून महानगरपालिकेने जागा ताब्यात ठेवावी व सुरक्षारक्षकाची नियुक्ती ताबडतोब करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. याचबरोबर आमदार सरनाईकांनी यासाठी जो निधी लागेल तो महानगरपालिकेकडून, शासनातर्फे अन्यथा आमदार निधीतून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नळपाडा, सुभाषनगर या परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा, बँक्वेट हॉल, शाळा व उद्यानाची निर्मिती होणार आहे. म्हणून स्थानिकांनी आमदार सरनाईक यांचे आभार मानले. असेही शेवटी पत्रकात आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -