घरठाणेपर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला ठाणेकरांकडून प्रतिसाद

पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला ठाणेकरांकडून प्रतिसाद

Subscribe

निर्माल्यात 50 टक्के घट

कोरोनाच्या संसर्गाने गेले दोन वर्ष नागरिकांना सळो की पळो केले आहे. मात्र हाच कोरोना आता पर्यावरणपूरक उत्सावासाठी साधक ठरला आहे. कित्येक वर्षे पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी आवाहन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनामुळे पर्यावरण पूरक उत्सव ही संकल्पना आता सत्यता उतरल्याचे निष्कर्ष महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर दीड दिवसांच्या विसर्जनाच्यावेळी संकलित होणाऱ्या निर्माल्यात यंदा तब्बल ५० टक्के घट झाल्याचे संबंधित विभागाने नमूद केले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना महापालिका हद्दीत राबविण्यासाठी चांगली कंबर कसली आहे. तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली. मात्र खाडीच्या पाण्यातील प्रदूषण रोखणे शक्य होत नसल्याचे दिसून येत होते. त्यातच गेल्या दोन वर्षात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन काही बंधणे ही घातली गेली. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदाच्या गणेशोत्सव निश्चितच बदल दिसून आला आहे. जरी गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या गणपती विसर्जनात थोड्या प्रमाणात वाढ झालेली असली तरी अनेक लोकांनी घरच्या घरी बाप्पाचे विसर्जन करून संकल्पना अंमलात आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून आले.

- Advertisement -

तसेच ज्यांना शक्य झाले त्यांनी मातीच्या किंवा शाडूच्या मातीचा अवलंब ही केला. तसेच मोठया मंडळांचे गणपती कमी झाले. त्याचबरोबर काही मंडळांनी बाप्पाच्या छोट्या मूर्ती बसवून उत्सव साजरा करण्यावर विशेष भर दिला. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण पूरक गणपती रुजविण्याचा प्रयत्न करण्यासाठी ठाणेकरांना आवाहन केले जात होते. त्याला कोरोनाची साथ लाभली आणि या वर्षी त्या संकल्पनेला लोकांनी सत्यात उतरल्याचे पाहण्यास मिळून आले आहे. त्यामुळे ज्याचा निश्चित फायदा पर्यावरणास झालेला दिसतो. त्यातच एक आणखी सकारात्मक बदल म्हणजे दीड दिवसांच्या विसर्जनाच्यावेळी संकलित होणाऱ्या निर्माल्यात यंदा ५० टक्क्यांनी घट झाली आहे. निर्माल्यात असणारे प्लास्टिक, थर्माकोल, रंगेबेरंगी चमकी, चायना मेड वस्तू यावेळी अजिबात नसल्याचाही दावा महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केला आहे.

या वर्षी सहा हजार मूर्तींची वाढ
२०२० यावर्षी २३ हजार ११७ गणपती मूर्तीचे ठामपाच्या हद्दीत विसर्जन झाले होते. २०२१ मध्ये त्या संख्येत सहा हजारांनी वाढ होऊन ती संख्या २९ हजार १२६ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -