घरठाणेखासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची शनिवारी प्रकट मुलाखत

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची शनिवारी प्रकट मुलाखत

Subscribe

गायक अवधूत गुप्ते साधणार संवाद

डोंबिवली । कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच संसदेचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘अविश्रांत श्रीकांत’ या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते खासदार डॉ.शिंदे यांची मुलाखत घेणार आहेत.

वाचन संस्कृती टिकावी यासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पै फ्रेंड्स लायब्ररी काम करत आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून डोंबिवली शहरात विविध ठिकाणी पुस्तक प्रदर्शन, पुस्तक आदान प्रदान महोत्सव यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच बरोबर विविध मान्यवर मंडळींच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात येत असते. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.या पार्श्वभूमीवर ‘अविश्रांत श्रीकांत’ या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायब्ररीच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात बदललेले राज्यातील राजकारण, ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मिळालेले मुख्यमंत्री पद आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामे यांसह विविध राजकीय आणि अराजकीय गोष्टींचा विषयांवरही यावेळी संवाद अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -