रेल्वे ट्रॅकवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; RPF जवानाने शेवटच्या क्षणी वाचवला जीव

RPF jawan saved women life

कल्याणातील रामबाग परिसरातील ५४ वर्षीय महिलेचा पुष्पक एक्स्प्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस फोर्सचे जवान जितेंद्र कुमार यादव यांच्या समय सूचकतेमुळे असफल होत महिलेला जीवनदान मिळल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक नजीक कसारा रेल्वे लोहमार्गावर रविवारी सकाळी घडली. रेल्वे पोलीस फोर्सचे जवान कल्याण लोको शेड येथून आपली ड्युटी संपवून परतत असताना रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशन नजीक कसारा रेल्वे लोहमार्गावर एक ५४ वर्षीय महिला कसारा रेल्वे ट्रॅकला अगदी कडेला उभी होती. समोरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून लखनऊकडे जाणरी पुष्पक एक्स्प्रेस येत होती. आर.पी.एफ. जवान जितेंद्र यादव यांनी तिला एक्स्प्रेस येत असल्याचे सांगितले आणि रेल्वे ट्रॅकपासुन बाजू होण्यास सांगितले परंतु आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या महिला सरळ रेल्वे ट्रॅकमध्ये झोपली.

आर.पी.एफ. जवान जितेंद्र यांनी येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या डा्व्हयरला ओरडत इशारा केला. गाडीची गती कमी असल्याने इंजिन ती रेल्वे ट्रॅकमध्ये असलेल्या स्थितीत पास झाले. दुसरा डबा पास होण्याआधी समयसूचकता दाखवित जितेंद्र यांनी रेल्वे रुळामधून बाहेर खेचून तिला बाहेर काढले. तातडीने घटनास्थळी रेल्वे स्टाफ पोहचत त्यांनी उपाचारार्थ रूक्मिणी बाई यांना रूग्णालयात नेले. आर.पी.एफ जितेंद्र कुमार यादव यांच्या कार्यतत्परतेमुळे रूक्मिणीबाई यांना जीवनदान मिळाले आहे.