घरठाणेमनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी सचिन वाझेच

मनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी सचिन वाझेच

Subscribe

विनायक शिंदे हा वर्सोवा येथे २००७ मध्ये झालेल्या लखनभैया खोटी चकमक प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होता.

मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे जवळ जवळ स्पष्ट होत असून या प्रकरणात एटीएसने निलंबित पोलीस शिपायासह दोघांना अटक केली आहे. तसेच या हत्याकांडात एटीएसने सचिन वाझे यांना मुख्य आरोपी दाखवले आहे. तसेच या हत्याकांडातील मुख्य सुत्रधाराचा कसून शोध घेतला जात असून आज रात्री पर्यंत बडी व्यक्ती एटीएसच्या हाताला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे (५१)आणि क्रिकेट बुकी नरेश गोर (३१) या दोघांना आज न्यायालयाने ३० मार्च पर्यत एटीएस कोठडी सुनावली आहे.

मनसुख हिरेन हत्याकांडाच्या तपासला वेग आला असून एटीएसच्या तपासात आज रात्रीपर्यत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच या सर्व घटनेच्या मुख्य सूत्रधारापर्यत एटीएस लवकरच पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे (५१)आणि क्रिकेट बुकी नरेश गोर (३१) या दोघांना न्यायालयाने ३० मार्च पर्यत एटीएस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यु प्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास केला होता. हा गुन्हा आपल्या हातातून निसटून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हातात जाणार असल्याचे कळताच एटीएसच्या तपासाला वेग आला आहे. रविवारी एटीएसमध्ये घडामोडी सुरू झाल्या असून याप्रकरणात एटीएसने विनायक शिंदे या निलंबित पोलीस शिपाई आणि क्रिकेट बुकी या दोघांना अटक केली.

विनायक शिंदे हा वर्सोवा येथे २००७ मध्ये झालेल्या लखनभैया खोटी चकमक प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत होता. मे २०२०मध्ये तो संचित रजेवर बाहेर पडल्यानंतर सचिन वाझे यांच्या संपर्कात आला होता. शिंदे हा वाझे यांच्या बेकायदेशीर कामात त्यांना मदत करीत असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. तसेच नरेश गोर या बुकीने सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना मोबाईलचे ५ बेनामी सिम कार्ड मिळवून दिल्याचा आरोप एटीएसने केला आहे.

- Advertisement -

मनसुख हिरेन हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून एटीएसने सचिन वाझे असल्याचे म्हटले असून यामागे आणखी काही मुख्य सूत्रधार असून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याचे एटीएसने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

मनसुख हिरेन हत्येचा तपास आपल्या हातून जाण्याच्या भीतीने एटीएसने हालचाली सुरू केल्या असून रविवारी एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग, पोलीस महानिरीक्षक शिवदीप लांडे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्यातील एटीएस कार्यालयात हजर झाले व त्यांनी मुंबईतील एटीएसचे काही अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावून घेतले असून त्यात चकमक फेम दया नायक यांचा देखील समावेश आहे.

एटीएस प्रमुख यांच्याकडून अधिकाऱ्यांना आज काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश देखील एटीएस प्रमुख यांनी दिले असून लवकरच या कटातील काही बडे हस्ती एटीएसच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -