Eco friendly bappa Competition
घर ठाणे ...म्हणून आम्ही युती केली, संभाजी ब्रिगेड - शिवसेनेच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी दिली माहिती

…म्हणून आम्ही युती केली, संभाजी ब्रिगेड – शिवसेनेच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी दिली माहिती

Subscribe

ठाणे – संभाजी  ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा नुकतीच उद्धव ठाकरे यांनी केली होती. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र, तरीही या दोन्ही पक्षांनी एकत्र येत युती केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आमच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरीही आम्ही सामायिक मुद्द्यांसाठी युती केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी दिली. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ आणि शिवसेना यांची आज संयुक्त पत्रकार परिषद ठाण्यात पार पडली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे उपस्थित होत्या.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ आणि शिवसेनेची राज्यात युती झाली आहे. युतीचं हेच लोण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. मातोश्रीनंतर ठाणे जिल्ह्यात ही पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. संभाजी ब्रिगेड ही लढाऊ संघटना आहे. शिवसेनेनेही संघर्ष केला आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेने निवडणुका लढवल्या तिथे शिवसेना जिंकली. त्यामुळे अनेकांना ते दिसू लागलं. यावरून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शिवसेना ही जातपात न मानणारी संघटना आहे. बाळासाहेबांनी राजकारणाकरता पक्ष काढलेला नाही, असं चिंतामणी कारखानिस म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघ यांनी शिवसेनेसोबत युती केल्याने येत्या निवडणुकीत तिकीट वाटप कसे होणार याबाबत विचारले असता  समान किमान कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुहास राणे यांनी दिली. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे या युतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहेत. समान किमान कार्यक्रम ठरणार आहे. दोन्ही पक्षांच्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या समित्या ठरणार आहेत. रुपरेषा आखली जाणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -