घरठाणेठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी

Subscribe

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र असावे यासाठी सुरू असलेल्या अकरा वर्षांच्या प्रयत्नांना यश

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र असावे यासाठी सुरू असलेल्या अकरा वर्षांच्या प्रयत्नांना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना यश आले आहे. १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधी ठाणे येथील या भवनाच्या कामाला अंतिम मंजुरी मिळावी असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या कामाला मंजुरीचे लेखी आदेश प्रसिद्ध केले आहेत.

अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने“ अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर रोड येथील कासारवडवली पोलिस स्टेशन जवळील भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. कासारवडवली पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा सदरहू सुविधा भुखंड ठाणे महानगरपालिकेने सामाजिक न्याय विभागाला मोफत हस्तांतरीत केलेला असल्याने सामाजिक न्याय विभागाला असलेली जागेची अडसर देखील दूर झाला आहे.

- Advertisement -

शासनाच्या योजनेनुसार ९० टक्के शासन व १० टक्के महापालिका खर्च करून पालिकेच्या माध्यमातून या वास्तूची देखभाल व दुरूस्ती भविष्यामध्ये होणार आहे तसा ठराव ठाणे महापालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केलेला आहे. यासाठी शासनाकडून १४ कोटी रूपये निधी मंजूर झाला असून या कामाची निविदा प्रक्रिया ह्या महिन्यात पुर्ण करून पुढील महिन्यात भवनाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -