ठाणे : मुंबई, ठाणेसह आसपासच्या उपनगरांमध्ये दहीहंडी मोठ्या उत्साह पार पडली. गेल्या महिन्यांपासूव विश्रांती घेतलेल्या पासवाने गुरुवार जोरदार हजेरी लावली. यामुळे गोविंदा सुखावले होते. यात खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका महादहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यात जवळपासून 200हून अधिक गोविंदा पथक सहभागी झाले होते.
या महादहीहंडी उत्सवाला ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. ही महादहीहंडी नालासोपाराच्या ओम साई नवभारत गोविंदा पथकाने वेडात मराठे वीर दौडले 7 या संकल्पनेवर आधारित जिवंत देखावा समोर सादर केला. हा देखावा महादहीहंडी उत्सवातील आकर्षक ठरले असून सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या नव्या मराठी चित्रपट बॉईज 4 या चित्रपटाची संपूर्ण टीम यांनी उपस्थिती दिली आहे. या महादहीहंडी उत्सवाला माजी मंत्री आदित्य ठाकरे , माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड ,शिवसेना सचिव आदेश बांदेकर,खासदार विनायक राऊत यांची व इतर मान्यवरांची उपस्थिती लागली आहे.
हेही वाचा – Dahihandi 2023 : पावसाच्या पुनरागमनाने गोपाळांचा उत्साह द्विगुणीत, राज्यात दहीहंडीचा उत्साह
मानाच्या दहीहंदी ‘या’ पथकाने फोडल्या
- मुंबईतील अखिल मालपा डोंगरी न 123 मित्र मंडळ गोविंदा पथक अंधेरी यांनी बाळासाहेब ठाकरे नावाची 1 लाख 11 हजार 111 हंडी फोडण्याचा मान पटकाविला आहे.
- ठाण्यातली धर्मवीरआनंद दिघे यांच्या नावाची 1 लाख 11 हजार 111 हंडी सिद्धेश्वर तलाव गोविंदा पथक,गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक, ओम साई गोविंदा पथक चंदनवाडी सायबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव या चार गोविंदा पथकांना विभागून देण्यात आली.
- महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची हंडी कोपरी ठाणे येथील शिवतेज महिला गोविंदा पथक यांनी मान पटकाविला आहे.