भयंकर! तिने दिला लग्नाला नकार; त्याने रागात पेटवून दिली स्कूटी

भांडण

लग्नासाठी नकार देणाऱ्या तरूणीची स्कूटी पेटवून दिल्याच्या प्रकार ठाण्यातील लोकमान्य नगर येथे दोन दिवसापूर्वी उघडकीस आला आहे. वर्तक नगर पोलिसांनी एका संशयितांवर गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे, अशी महिती वर्तक नगर पोलिसांनी दिली. याघटनेनंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणारी २१ वर्षीय तरुणी एका आटो फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. वडिलांनी तिला नोकरीच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नवीकोरी टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी विकत घेऊन दिली होती. गेल्या वर्षी या तरुणीची ओळख वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या तुषार कवर या तरुणासोबत झाली होती. तुषार अधूनमधून या तरुणीच्या घरी देखील येत-जात होता. त्याने आपल्या काही मित्रांसोबत तरुणीची ओळख करून दिली होती. गेल्या महिन्यात तुषार हा या तरुणीच्या घरी आला आणि थेट त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी विचारले. परंतू आपण फक्त मित्र असून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे या तरुणीने तुषारला सांगितले. तसेच या तरुणीच्या आई वडिलांनी देखील लग्नासाठी स्पष्ट नकार दिल्यामुळे संतापलेल्या तुषारने काही दिवसांपूर्वी या तरुणीला बाजारात गाठले आणि तू माझ्यासोबत लग्न नाही केलेस तर तुला तुझ्या स्कुटीसह पेटवून देईल, अशी धमकी देऊन निघून गेला.

हेही वाचा –

बापरे! ढगातून सोन्याच्या बिस्कीटांचा पाऊस; गावकऱ्यांची केली सोनं लुटायला गर्दी