घरठाणेनागला बंदर किल्ला शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करा- आमदार सरनाईक

नागला बंदर किल्ला शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करा- आमदार सरनाईक

Subscribe

पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेला ठाणे घोडबंदर रोडवरील ऐतिहासिक नागला बंदर किल्ला शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी ओवळा माजीवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तर , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक तथा पुरातत्व खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले व त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले.अशी माहिती सरनाईक यांनी दिली. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भाईंदर पाडा या गावामध्ये खाडी किनारी नागला बंदर हा ऐतिहासिक किल्ला असून पुरातत्व खात्यामध्ये व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दफ्तरी ’ऐतिहासिक किल्ला अशी नोंद आहे. या किल्लाला ऐतिहासिक महत्व आहे. खरं तर, आजपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या किल्ल्याची डागडुजी करणे आवश्यक होते, परंतू, आजपर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाने या ऐतिहासिक किल्याची दखल घेतल्याची नोंद दिसून आली नसल्याचे आमदार सरनाईकांनी निवेदनापत्रात म्हटले.

तरभाईंदर पाडा येथील ग्रामस्थांनी या किल्ल्याच्या दुरावस्थेबद्दल माहिती दिल्यावर तात्काळ शनिवार 11 मार्च,2023 रोजी आपण स्वतः गावकर्‍यांसह या किल्ल्याची पाहणी करायला गेलो. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून मोठ्या धक्का बसला. कारण या किल्ल्याची आसपासची जमिन एका भुमाफियाने ताब्यात घेऊन हा किल्ला असलेला डोंगर पुर्णपणे तोडायला घेतलेला आहे. त्या ठिकाणी खडी क्रशर मशीन बसविण्यात आली असून या डोंगरावरील दगड तोडून दगड व त्याचा भुसा सर्रासपणे विकला जात होता. पर्यावरण खात्याचे कुठल्याही नियमांचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी व आजुबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुर व धुळीचे साम्रज्य पसरले होते. ज्या ठिकाणी किल्ला होता त्या ठिकाणी फक्त भग्न अवस्थेतील दोन भिंती आढळल्या असून त्या भिंतींवरच खडी क्रशरसाठी लागणारे साहित्य व भंगार सामान ठेवल्यामुळे किल्ल्याचे भग्न अवशेषही त्या ठिकाणी दिसत नव्हती. पुरातत्व खाते व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दफ्तरी नोंद असलेला ह्या ऐतिहासिक किल्ल्याचे भग्न अवशेष देखील नेस्तनाबूत करून हा ऐतिहासिक किल्ला अनधिकृतपणे खडी क्रशर चालविणार्‍या भुमाफियाचा हडप करण्याचा डाव असल्याचा दाट सशंय आमदार सरनाईकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

एका बाजूला राज्यातील गड-किल्ले सुस्थितीत आणण्यासाठी व त्यांची निगा व देखभाल करण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच आमदार या नात्याने घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व कायम ठेवत असताना ठाणे शहरातील नागला बंदर किल्ल्याचे अस्तित्व एका भुमाफियामुळे नष्ट होत असल्याचे प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आपण व्यथित झालो आहे.असेही नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण हा किल्ला पुर्न:जिवित करण्यासाठी पुरातत्व खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका यांना माझ्या पत्राची दखल घ्यावयास सांगून पोलिसांमार्फत ज्या कोणी भुमाफियाने या नागला बंदर किल्ल्याचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात एक एसआयटी स्थापन करून त्यासंबंधीत सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी व या ऐतिहासिक किल्ल्याला पुर्न:जिवन द्यावे, अशी विनंती ही त्यांनी केली आहे. आमदार सरनाईक यांनी विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्ममेशनच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला असता यासंदर्भात शासनाने त्वरित कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक तथा पुरातत्व खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले व त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले. अशी सरनाईकांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -