HomeठाणेShahapur : शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगारावर गोळीबार

Shahapur : शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगारावर गोळीबार

Subscribe

उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू

शहापूर । शहापूर तालुक्यात छोट्या मोठ्या घरफोडी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन स्नॅचिंग यासारख्या चोरीच्या घटना घडत होत्या. आता मात्र निर्ढावलेल्या लुटारूंची हिंमत गोळीबार आणि हत्या करेपर्यंत वाढली आहे.
२१ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शहापूर येथील पंडित नाका तुकाराम चौक परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सचा कामगार दिनेशकुमार मानाराम चौधरी (२५) हा ज्वेलर्स दुकान बंद करून दुचाकीवरून जात असताना अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये दिनेशकुमार गंभीर जखमी झाला असून अज्ञात आरोपींनी त्याच्याकडील बॅग घेऊन पोबारा केला आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिनेश कुमार याचा ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २२ डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहापुरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ २२ डिसेंबर रोजी शहापूर तालुक्यातील आणि वाशिंद शहरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारला होता. याशिवाय शहापूर पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढून अज्ञात हल्लेखोरांना ४८ तासाच्या आत अटक करण्याची मागणी केली. हल्लेखोरांना ४८ तासाच्या आत अटक न केल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या मूक मोर्चाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहापूर शहर ज्वेलर्स असोसिएशनकडून या घटनेचा निषेध वर्तविण्यात आला आहे. या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -