घरठाणेशरद पवार अँटी करप्शनच्या जाळ्यात

शरद पवार अँटी करप्शनच्या जाळ्यात

Subscribe

भिवंडीतील लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन लाखांची लाच घेताना पकडले

भिवंडी । भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना नारपोली पोलीस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे 7 डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार करीत होते.
आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी तर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत शरद पवार यांनी अनिकेतच्या आईकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर महिलेने त्यांची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना पकडले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -