घरठाणेरविवारी कळव्यात शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

रविवारी कळव्यात शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

Subscribe

ठाणे । गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार 7 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड-कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे. या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक, तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्याशी +91 98190 95047; अरूण नागवेकर (वांद्री,ता. संगमेश्वर) 9405080085; प्रमोद चोचे 9152091780, 9820769959 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -