अमेरिकेतील डॅलस-फोर्टवर्थ येथील वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी १९ फेब्रुवारी रोजी मोठया दिमाख्यात शिवजयंती साजरी केली. यावेळी,१२५ हून अधिक कलाकारांनी दृक्श्राव्य माध्यमाच्या मदतीने शिवजन्मपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा प्रवास सर्व प्रेक्षकांसमोर उलगडला. ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी, सुमारे १००० हून आधी सभासदांनी सहभाग घेतला होता. यंदा प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम मंडळातर्फे सादर होतोय आणि ह्यातून पुढच्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य नेण्यात आम्ही खारीचा वाटा उचलतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
अमेरिकेतील डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे शिवजयंती साजरी केली जात आहे. याही वर्षी १९ फेब्रुवारीला मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना, मंडळाचे सचिव संतोष देशमुख यांनी सांगितले की, “सर्व मराठी सण मंडळ साजरे करते आणि शक्यतो ज्यादिवशी तो सण आहे त्यादिवशीच तो साजरा करण्याकडे मंडळाचा कल असतो. यावर्षी शिवजयंती रविवारी असल्यामुळे त्याच दिवशी मंडळाने शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.” तर मंडळाचे खजिनदार श्रीरंग गोल्हार यांनी माहिती दिली की, “मंडळातर्फे सभासदांसाठी काही खास कार्यक्रम विनामूल्य असतात. त्यात शिवजयंती सोहळाही असतो. जास्तीत जास्त सभासदांना आपल्या आराध्य दैवतेचा सोहळा साजरा करण्यासाठी सामील होता यावे हा हेतू यामागे आहे.”
डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सतीश थोपटे यांनी “यावर्षीचा शिवजयंती सोहळा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण होते असे सांगितले. डॅलसचे सुजित साठे यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन “राजा शिवछत्रपती” हा शिवजन्मपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत विविध घटना दाखवणाऱ्या कार्यक्रमात डॅलसचे १२५ हून अधिक कलाकारांनी दृक्श्राव्य माध्यमाच्या मदतीने हा प्रवास सर्व प्रेक्षकांसमोर उलगडला. या कार्यक्रमानंतर ढोल-ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुमारे १००० हून आधी सभासदांनी हजेरी लावली. मिरवणुकीनंतर सर्व सभासदांसाठी पिठलं-भाकरी, भुरका, असा बेत ठेवण्यात आला होता. सुमारे १२५ हून जास्त कलाकारांनी गेले २-३ आठवडे अथक परिश्रम घेऊन सराव केला आणि सर्व प्रेक्षकांच्या दीर्घ काळ स्मरणात राहील असा कार्यक्रम त्यांच्यापुढे सादर केला. असे सचिन मरीगुद्दी यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाला रवींद्र खोकराळे, सचिन फुंडे यांनी यांनी मेहनत घेतली.