घरठाणेठाण्यात धुळवड उत्साहात साजरी

ठाण्यात धुळवड उत्साहात साजरी

Subscribe

ठाणे/कल्याण। ठाण्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात तसेच स्थानिक नागरिकांनीही होळी आणि धुळवड उत्साहात साजरी केली. धुळवडीच्या निमित्ताने ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर टिका केली. तर आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे कार्यालयाबाहेर आनंदाने धुळवड साजरी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याजवळ आणि आनंद आश्रमात शिवसैनिकांसोबत नागरिकांनाही होळीच्या सदिच्छा दिल्या. ठाण्यातील मासुंदा, उपवन तलावाजवळ तरुणांनी गर्दी करत धुळवड साजरी केली.
बुरा ना मानो होली है असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी बचतीचा संदेश देत कोरडी होळी खेळणे पसंत केले. तर काही ठिकाणी विविध सोसायट्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आनंद लुटला.
प्रत्येक गल्ली गल्लीत ग्रुप ग्रुपने तरुणाई रंगांचा हा उत्सव साजरा करत होती. काही ठिकाणी डी.जे. च्या तालावर थिरकताना अनेक जण पाहायला मिळाले. तर काहीजणांनी बाईकवर स्वार होत आपल्या ग्रुप सोबत धम्माल केली.

कल्याणात धुलीवंदनाचा उत्साह
बुरा ना मानो होली है असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी बचतीचा संदेश देत कोरडी होळी खेळणे पसंत केले. तर काही ठिकाणी विविध सोसायट्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आनंद लुटला. प्रत्येक गल्ली गल्लीत ग्रुप ग्रुपने तरुणाई रंगांचा हा उत्सव साजरा करत होती. काही ठिकाणी डी.जे. च्या तालावर थिरकताना अनेक जण पाहायला मिळाले. तर काहीजणांनी बाईकवर स्वार होत आपल्या ग्रुप सोबत धम्माल केली.

- Advertisement -

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव साजरा
ठाणे । शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी, धुळवड साजरी करावी, अशा शुभेच्छा प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्या आहेत. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते.
ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या व धुळवडीच्या खुप खुप शुभेच्छा देतो. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे जावो. आपल्या मनातील जो काही राग, लोभ असेल तो जावो आणि नवीन शुद्ध मनाने, आनंदाने, सगळ्या ठाणेकरांनी ही होळी, धुळवड साजरी करावी, अशा शुभेच्छा या निमित्ताने पुन्हा एकदा देत आहे, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -