घरठाणेमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजविणारे कृत्य, ठाण्यातील शिवसेना प्रवक्त्यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजविणारे कृत्य, ठाण्यातील शिवसेना प्रवक्त्यांचा सवाल

Subscribe

ठाणे – काल टेंभी नाका येथील अंबे मातेच्या आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा केअर टेकर चंपा सिंग थापा व मोरेश्वर राजे यांना शिंदे गटामध्ये प्रवेश घेऊन महाराष्ट्र राजकारणात लाज वाटणारे कृत्य केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभी नाका जय अंबे मातेच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत चंपा सिंग थापा व मोरेश्वर राजे यांनी आम्हास पाठिंबा असल्याचे जाहीर करून प्रवेश घेतला. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचे होत ? सत्तेची मस्ती की स्वतःचा मोठेपणा? मातोश्रीवर बाळासाहेबांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी काम करत होते आणि आहेत. त्यामध्ये सफाई कामगार, जेवण बनवणारे वाढपे, सुरक्षारक्षक असे अनेकांचा समावेश आहे. यांचाही प्रवेश शिंदे गटात करून घेणार की काय ? असा सवाल ठाणे शिवसेना प्रवक्त्यांच्या वतीने करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच काम हे राज्याची धुरा वाहण्याच आहे. परंतु मुख्यमंत्री ठाकरे घराण्यावरील द्वेषापोटी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा निवासस्थानी हा प्रवेश घडून आणला असता तर एकवेळ क्षम्य होत. परंतु भर रस्त्यात ते सुद्धा देवीचे आगमन होत असताना केलेले हे कृत्य मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही.

- Advertisement -

महाराष्ट्राला मा. यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभले आहेत. परंतु काल या मुख्यमंत्र्यांनी केलेले कृत्य हे त्यांच्या पदाला शोभा आणणारे नाही.

थापा हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत होते. शिवसेना प्रमुख त्यांची अत्यंत काळजी घेत होते. त्यांना वेळोवेळी भरपूर मदत त्यांनी केली होती. शिवसेना प्रमुख स्वर्गवासी झाल्यानंतर थापा यांनी नेपाळला जाण्याचे ठरवले त्यावेळी सुद्धा त्यांना नेपाळ ला सन्मानाने पाठविण्यात आले. परंतु नेपाळ मध्ये त्यांचे मन रमले नसावे आणि ते मुंबईला परत आले. नोकरी सोडल्यामुळे त्यांना मातोश्री वरती पुन्हा रुजू करून घेतले नसावे. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळे असावे त्यामुळे मा. उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे ते गेले असावेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र या गोष्टीचे भांडवल करत त्यांचा प्रवेश धार्मिक मिरवणुकीत करून घेतला हे कृत्य योग्य नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -