घरठाणेकौटुंबिक कहलातून राहत्या घरात गोळीबार; आरोपीस अटक

कौटुंबिक कहलातून राहत्या घरात गोळीबार; आरोपीस अटक

Subscribe

सासऱ्यानं सुनेवर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कहलातून राहत्या घरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मुले आणि पत्नी घरात असताना राजेश शर्मा (५१) यांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

सासऱ्यानं सुनेवर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कहलातून राहत्या घरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मुले आणि पत्नी घरात असताना राजेश शर्मा (५१) यांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. विशेष म्हणजे यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून, दारूच्या नशेत परवानाधारक बंदुकी गोळीबार केला आहे. हा प्रकार कौटुंबिक कहलातून घडल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी राजेश याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माजीवडा येथील लोढा संकुलामध्ये शर्मा हे पत्नी आणि तीन मुलांसह राहत आहेत. त्यांची तिन्ही मुले कामधंदे करत नसल्याने पितापुत्रांमध्ये वारंवार भांडणे होत होती. त्यात ते दारू व्यसनाच्या आहारी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी दारूच्या नशेत असताना, त्यांनी त्यांच्याकडील परवानाधारक असलेल्या बंदुकीतून राहत्या घरात गोळीबार केला. पत्नी आणि दोन मुले असताना त्यांनी हवेत गोळीबार केला.

- Advertisement -

यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. तर गोळीबार करणारे शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. “कौटुंबिक कहलातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिकदर्शी दिसत आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच ज्या बंदुकीतून गोळीबार झाला ती बंदूक परवानाधारक आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत शर्मा यांनी अटक करण्यात आली आहे”, असं कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी सांगितलं.


हेही वाचा – दादर-माटुंग्याजवळ 2 एक्स्प्रेसमध्ये अपघात; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- Advertisement -

 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -