Eco friendly bappa Competition
घर ठाणे मासिक पाळीच्या अज्ञानातून घेतला बहिणीचा बळी

मासिक पाळीच्या अज्ञानातून घेतला बहिणीचा बळी

Subscribe

ठाण्यात भावाकडून धाकट्या बहिणीची हत्या

चारित्र्याच्या संशय वरून एका भावाने आपल्या लहान अल्पवयीन बहिणीची सतत तीन दिवस मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघड झाला. ही उल्हासनगर मधील शांती नगरात घडली असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र यामुळे भावाने बहिणीवर अनैतिक प्रकार केल्याचा संशय व्यक्त करून तिला मारझोड केली, यात मारझोडीत तिचा मृत्यू झाला. मासिक पाळीविषयी केवळ अज्ञान आणि समाजात पसरलेल्या गैरसमजातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगर येथील शांतीनगरात भाऊ हा त्याची पत्नी आणि 12 वर्षाच्या बहिणी सोबत राहत असे. त्याचे वडील गावी राहतात तर आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. भावाने बहिणीला पालन पोषणासाठी स्वतःसोबत घरी ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या लहान बहिणीला मासिक पाळी आली. भावाच्या पत्नीने याविषयी संशय व्यक्त केला, सोबतच भावानेही बहिणीच्या चारित्र्याविषयी संशय व्यक्त करून तिला मारझोड केली. या प्रकारात छोट्या बहिणीलाही मासिक पाळीविषयी काहीही माहिती नसल्यामुळे आणि आपल्यासोबत मासिक पाळीविषयी असलेल्या अज्ञानातून असं का होत आहे, हे समजून न आल्यामुळे ती घाबरली होती. त्यातच भावाने कुठलाही विचार न करता बहिणीला बेदम मारहाण केली. त्यामुळे बहिण बेशुद्ध झाल्याने घाबरलेल्या भावाने सरकारी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे डॉक्टरांनी पोलिसांना बोलावल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी भावावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -