घरठाणेबहिणीच्या नवर्‍याची मेहुण्याने केली हत्या

बहिणीच्या नवर्‍याची मेहुण्याने केली हत्या

Subscribe

आरोपी अवघ्या दोन तासात जेरबंद

ठाकुर्ली जवळच्या खंबाळपाड्यात बहिणीच्या नवर्‍याची चाकूने हत्या करून मूळ गावी पळण्याच्या तयारीत असलेल्या मेहुण्याला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली. रमेश वेलचामी (तेवर) असे या मारेकर्‍याचे नाव असून तो मूळ गावी तामिळनाडू राज्यात पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र पोलिसांनी त्याला कल्याणच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा परिसरात मारीकणी रामास्वामी तेवर हे आपल्या कुटुंबासह राहतात. इडली विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मारीकणी यांना दारूचे व्यसन होतं. गुरूवारी दुपारच्या सुमारास मारिकनी हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी सासरच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

यावेळी मेव्हणा रमेश तेवर याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र मारीकणी काही ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रमेशने मारीकणी याच्यावर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात मारीकणी याचा जागीच मृत्यू झाला.या घटने नंतर मेहुणा रमेश वेलचामी तेथून बेपत्ता झाला. एकीकडे स्थानिक टिळकनगर पोलिस त्याचा शोध घेत होते. तर दुसरीकडे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण पथकानेही समांतर तपास सुरू केला.

- Advertisement -

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पोलीस पथकांकडून फोटो, तसेच मोबाईल नंबरसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मारेकर्याचा शोध घेतला जात होता. कल्याणच्या रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र. 6 या मुंबईच्या दिशेकडील पुलाजवळ पथकाने रमेश वेलचामी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रमेश वेलचामी याच्याजवळ गाडी क्र. 22157 चैन्नई एग्मोर या जलद गाडीचे ई-तिकीटआढळून आले. त्याने कांचनगाव-खंबाळपाड्यात राहणारा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) या बहिणीच्या पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे वपोनि किशोर शिरसाठ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -