घरठाणेठाणे जिल्ह्यात तीन दिवसात साडेसहा हजार नागरिकांना लस

ठाणे जिल्ह्यात तीन दिवसात साडेसहा हजार नागरिकांना लस

Subscribe

ठाणे महापालिकेने मारली बाजी

तिसर्‍या टप्प्याला १ मार्च पासून सुरुवात झाली असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. यावेळी खासगी रुग्णालयात लस २५० रुपयांमध्ये दिली जाणार आहे. मात्र, अद्यापही खासगी रुग्णालयात लस देण्यास सुरुवात झालेली नसून ज्या ठिकाणी लस दिली जात आहे, तेथे सावळा गोंधळ सुरू आहे. त्यातच, गेल्या दिवसात ठाणे जिल्ह्यात साडेसहा हजार नागरिकांना लस दिली गेली असून लसीकरणामध्ये ठाणे महापालिकेने बाजी मारली आहे. ठामपामध्ये तीन दिवसात ३ हजार ३६४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भाग आहे. त्यामध्ये १ मार्चपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांसह ६० वर्षावरील नागरिकाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ही लसीकरण मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह, शहापूर, मुरबाड आणि भिवंडी उपजिल्हा रुग्णालयांसह १३ रुग्णालयांमध्ये तर, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच सहा महानगर पालिका क्षेत्रात पालिका रुग्णालयांमध्ये अथवा उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, या लसीकरण मोहिमेला १ मार्च पासून सुरुवात झाली असताना मात्र लसीकरणाच्या पहिल्याच दिवसापासून केंद्रांवर होणारी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी, त्यात सर्व्हर डाऊन होण्याच्या प्रकारांमुळे केंद्रांवर गोंधळ झाल्याचे चित्र शहरी भागात दिसून आले. त्यातच, जिल्ह्यात १ ते ३ मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत सहा हजार ५५६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंगे यांनी दिली. यामध्ये ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त ८५८ तर, ६० व त्यापुढील वयोगटातील पाच हजार ६९८ समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत ठाणे महानगर पालिकेने बाजी मारत, ३ हजार ३६४ जेष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्या पाठोपाठ मीरा भाईंदर मध्ये ९३७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे . ठाणे ग्रामीण ८२४, कल्याण-डोंबिवलीत ६५४, उल्हासनगरात १७४, भिवंडीत ८५, आणि नवी मुंबईत ५२८ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -