ठाण्यात स्लॅबचे प्लास्टर कोसळले

 कॉलमला गेले तडे

plaster of the ceiling collapsed at Goregaon child died and a woman was injured
प्रतिकात्मक फोटो

राम मारुती रोड, या ठिकाणी तळ अधिक दोन मजली शृंगारपुरे हाऊस या अंदाजे ५५ वर्षे जुने इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर ०२ च्या हॉल व बेड रूमचे स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास समोर आली. तसेच या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कॉलमला देखील तडे गेले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून सुरक्षेच्या कारणास्तव ती रूम रिकामी करण्यात आली. शृंगारपुरे हाऊस या इमारतीत तळ मजल्यावर पाच दुकान असून पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी दोन रूम आहेत. यामध्ये शांताराम चाळके यांच्या मालकीच्या रूमच्या हॉल आणि बेड रुमचे स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे.

तसेच त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कॉलमला देखील तडे गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी माजी लोकप्रतिनिधी, कनिष्ठ अभियंता(सार्वजनिक बांधकाम विभाग), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (नौपाडा प्रभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. रूम नंबर ०२ ही सुरक्षेच्या कारणास्तव रिकामी करण्यात आली असुन अतिक्रमण विभागामार्फत त्या रूमला सील करण्यात आली आहे. तर रूममधील रहिवाश्यांनी स्वतःची राहण्याची सोय स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.