घरठाणेभिवंडीत लसीकरणास संथ प्रतिसाद

भिवंडीत लसीकरणास संथ प्रतिसाद

Subscribe

मनपा कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास राहणार लाभापासून वंचित

सरकारकडून करोना विरोधातील लढ्यात सर्वात पुढे राहून या संसर्गास थोपविण्याचे काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील आरोग्य कर्मचारी , महानगरपालिका कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-यांना सर्वात प्रथम लस दिली जात असताना भिवंडी शहरात या लसीकरणास संथ प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे यात महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्यने असल्याने करोना लसीकरण न घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा करोना काळात सेवा वाजवताना मृत्यू झाल्यास त्यास दहा लाखांच्या अनुदान लाभापासून वंचित रहावे लागेल, असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत. तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती अजूनही ही लस घेण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

22 फेब्रुवारी पर्यंत १६७४ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोविड लसीचा पहिला डोस आणि त्यापैकी ६२४ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अधिकारी यापैकी आतापर्यंत फक्त २८३९ मनपा अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच त्यापैकी फक्त २० जणांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ४ हजारहून अधिक अधिकारी कर्मचारी आस्थापनेवर असताना लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी आस्थापना विभागासह सर्व विभाग प्रमुखांना पत्र देऊन सर्व कर्मचारी अधिकारी यांनी लस घेण्या बाबत सूचना केली. लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्यावर असताना करोनामुळे निधन झाल्यास महानगरपालिका प्रशासनातर्फे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिले जाणारे दहा लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार नसल्याचे एक आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सध्या देण्यात येत असलेली कोव्हिशिल्ड ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या लसीचा दुसरा डोस घेतल्या नंतर साधारणतः १५ दिवसांनी शरीरात पूर्ण क्षमतेने करोना विरूद्ध प्रतिकारशक्ती तयार होते. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, योग्य अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, सॕनिटायझरचा वापर, गर्दीमध्ये जाणे टाळणे हे अनिवार्य असणार आहे. ज्या आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचाऱी व पोलीस यांनी अद्याप कोविड लस घेतली नाही, त्यांनी ती त्वरित घ्यावी, स्वतःला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाला संरक्षित करावे, असे आवाहन भिवंडी महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एन. खरात यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -