घरठाणेओवळा माजीवड्यातील झोपडपट्टया, अनधिकृत बांधकामांचा क्लस्टर योजनेत समावेश व्हावा

ओवळा माजीवड्यातील झोपडपट्टया, अनधिकृत बांधकामांचा क्लस्टर योजनेत समावेश व्हावा

Subscribe

सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या १५ ते २० वर्षांच्या मेहनतीनंतर देशातील पहिली क्लस्टर योजना ही ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये साकार होत आहे. त्यातच,ओवळा माजीवडा या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विजयनगर, शास्त्रीनगर, भिमनगर, लक्ष्मी-चिराग नगर, कोकणी पाडा, गांधीनगर, नळपाडा व घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील झोपडपट्टया व अनधिकृत बांधकामांचा क्लस्टर योजनेत समावेश करावा अशी मागणी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील क्लस्टर योजनेला आपण न्याय देत असताना झोपडपट्टीवासीयांचा सुध्दा विचार होणे तेवढेच गरजेचे आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टयांचा विचार करता जो दर मुंबईच्या विकासकांना मिळत असतो तो दर ठाणे शहराखेरीज महानगरपालिका क्षेत्रातील इतर भागांमध्ये मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी विकासक सामोरे येत नाही अथवा सामोरे आलेच तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प अपुर्ण असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

त्याचे दुसरे कारण म्हणजे झो.पु. योजनेमध्ये झोपडपट्टीवासीयांना सन २००० पुर्वीचा वास्तव्याचा दाखला असणे बंधनकारक आहे तर क्लस्टर योजनेमध्ये सन २०२० चा वास्तव्याचा दाखल असणे बंधनकारक आहे. त्यामुळे सुमारे २५ ते ३० टक्के झोपडपट्टीधारक हे झोपडपट्टी पुर्नवर्सन योजनेमध्ये समाविष्ट होत नसल्याने या योजनेला गती मिळत नाही. तसेच झोपडीधारकांची मोठ्या परिवारानुसार कितीही मोठी जागा असल्यास झो.पु. योजनेअंतर्गत त्यांना फक्त नियमानुसार २७९ स्के.फुट क्षेत्रफळाचे घर मिळत असते पण क्लस्टर योजनेमध्ये जेवढे घराचे क्षेत्रफळ असते त्यानुसार बाधीतांना घर दिले जाणार आहे. तसेच एस.आर.ए. योजनेमध्ये पहिला व दुसऱ्या मजल्यावरील ज्याचे घर असेल त्याला या योजनेमध्ये ग्राह्य धरले जात नाही पण क्लस्टर योजनेमध्ये पहिला अथवा दुसरा मजला असणाऱ्यांना घर दिले जाणार आहे. तसेच वाढीव क्षेत्रफळाची आवश्यकता असल्यास नियमानुसार विकासकाला द्यावे लागणार असल्याने झोपडपट्टीवासीयांचा झो.पु. योजनेऐवजी क्लस्टर योजनेकडे कल जास्त असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला सर्व सुविधायुक्त मोठे व अधिकृत घर मिळावे त्याचबरोबर सर्व योजना लवकरात लवकर कार्यान्वीत व्हाव्यात यासाठी माझ्या मतदारसंघातील विजयनगर, शास्त्रीनगर, भिमनगर, लक्ष्मी-चिरागनगर, कोकणी पाडा, गांधीनगर, नळपाडा व घोडबंदर रोडवरील आनंदनगर या सर्व झोपडपट्यांचा समावेश क्लस्टर योजनेमध्ये करून सर्वसामान्य जनतेच्या मनातील घराचे स्वप्न आपल्या नेतृत्वाखाली साकारून पुर्ण करावे, असेही सरनाईक यांनी त्यामध्ये म्हटले आहे. तर नगरविकासमंत्री व मुख्यमंत्री कार्यकाळात यशस्वी झालेली पहिली क्लस्टर योजना काही दिवसांतच साकार होत असल्याबद्दल अभिनंदन ही केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -