घरठाणेलवकरच ठाण्यातही खेळता येणार बर्फात

लवकरच ठाण्यातही खेळता येणार बर्फात

Subscribe

 मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आता स्नो पार्क आणि अ‍ॅम्युझमेंट पार्क

 बर्फाचा सहवास आणि त्यामध्ये खेळणे लहान-थोरांना अशा सर्वांनाच हवा हवा असाच असतो. त्यासाठी हजारो रुपये खर्चून एकतर काश्मीर, सिमला यासारख्या ठिकाण जावे लागते. किंवा मुंबईतील स्नो पार्क गाठावे लागते. पण आता ठाणेकर नागरिकांसाठी ठाण्यात स्नो पार्कचा आनंद लवकर लुटता येणार आहे. या पार्कच्या माध्यमातून ना मुंबई किंवा काश्मीर या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. स्नो पार्कच्या सोबतीला अ‍ॅम्युझमेंट पार्क ही कोलशेत येथील पार्क आरक्षणाच्या जागेत उभे राहणार आहे. गेल्या चार वर्षे कागदावर असलेला स्नो पार्कचा प्रस्ताव पुन्हा एकदा पालिकेने बाहेर काढून प्रकल्प पीपीपी (खाजगी लोक सहभागातून) तत्वावर उभारण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार ही नियुक्त करण्यात येणार असून त्याची ‘फी’ सुद्धा हा प्रकल्प विकसित करणारा विकासक आदा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे स्नो पार्क नाहीतर अ‍ॅम्युझमेंट पार्कमुळे ठाण्यात आंतरराष्ट्रीय केंद्र उभे राहणार आहे.
यापूर्वी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने म्हणजे २०१६ सालीच या स्नो पार्कच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत मान्यता दिली होती. त्यावेळी ठाणे शहरातील कोलशेत परिसरातील आरक्षण क्रमांक ५ या भूखंडावरील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर फक्त स्नो पार्क विकसित करण्यात येणार होते. परंतु आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. त्यानुसार १ लाख ५० हजार चौरस मीटर क्षेत्रावर आता या ठिकाणी स्नो पार्क बरोबर आता अ‍ॅम्युझमेंट पार्कही उभे केले जाणार आहे. यासाठी पुर्वीची आरक्षित जागा आणि एच.सी.एम.टी.आर क्षेत्र त्यासाठी एकत्रित करण्यात आले आहे. या माध्यमातून ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजनाचे जणू केंद्रच उपलब्ध होणार आहे.
स्नो पार्क आणि अ‍ॅम्युझमेंट पार्क असा एकत्र रित्या प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत पुढे आणून त्याला मंजूर देण्यात आली. तसेच त्यानुसार या प्रकल्पासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार असून त्या कंपनीकडून या केंद्राचा संपूर्ण आराखडे, नकाशे, अंदाजखर्च, प्रकल्प कालावधी, निविदा प्रक्रिया आदींसह इतर कामे करुन घेतली जाणार आहेत. याच्यासाठी १ कोटी १८ लाख ९६ हजार ५५४ खर्च होणार आहे. या खर्चाचा भर हा महापालिकेवर पडणार नसून त्या खर्चाची जबाबदारी ही सुध्दा तो प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाच्या खांद्यावर टाकण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच बर्फात खेळण्याचा आनंद ठाणेकरांना ठाण्यात अनुभवता येणार हे मात्र तितकेच खरे आहे.
 असा असेल स्नो पार्क
सुमारे ५०० लोक क्षमतेचा मुख्य स्नो पार्क, मुख्य स्नो पार्क करीता चेजींग रुम, कुलिंग क्षेत्र सोव्हेनियअर स्टोअर्स, डिजीटल व फोटोशॉप, फ्रेश रुम्स, टिकेटींग एरिया आदी.
 तर असे असेल अ‍ॅम्युझमेंट पार्क
सुमारे आठ ते दहा ड्राय राईडस, जसे कॉफी कप, सन अ‍ॅण्ड मुन, फैमिली रोलर, कोस्टर, सिक्स रिंग, रोलर फोस्टर, कोरीजील, स्टिंग टॉवर ४५ मीटर, ड्रॉप टॉवर, डिस्को कोस्टर जायंट व्हील, पेंन्ड्युलम आणि फॅन्टसी प्लॅनेट आदींचा समावेश.
 या आहेत इतर सुविधा व आर्कषण
९ डी सिनेमा, एचडी सिनेमा, हॉरर हाऊस, मोटर मेज, इको पार्क व नेचर ट्रेल, पार्कींग प्लाझा, फुट पार्क, सोसेनियर शॅम्पस, डिपार्टमेन्टल स्टोअर्स, एक्झिबिशन हॉल, फॅशन हॉल बॅन्केव्ट, इनडोअर अ‍ॅक्टीव्हीटीज, हॅप्पी स्ट्रीट आदी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -