घरठाणे...तर ठाण्यात लसीकरणाला १५ दिवस पुरे

…तर ठाण्यात लसीकरणाला १५ दिवस पुरे

Subscribe

जर ठाण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेनुसार ६० लाख डोस उपलब्ध झाल्यास ठाण्याचे लसीकरण अवघ्या १५ दिवसात पूर्ण होईल

ठाणे महापालिकेकडून लसीकरण सुरळीत व्हावे आणि ठाणेकर नागरिकांना त्याची व्यवस्थित माहिती मिळावे यासाठी लसीकरण केंद्रासह कोणत्या गटाला कुठे आणि किती डोस दिले जाणार आहेत. याची माहिती डोस उपलब्धतेनुसार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लस डोस उपलब्धतेनुसार नागरिकांनी त्या केंद्रांवर जावे, तसेच ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांनी दिलेल्या वेळेत केंद्रांवर जावे उगाच आधीपासून विनाकारण गर्दी करू नये. असे  आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली. त्याचबरोबर जर ठाण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेनुसार ६० लाख डोस उपलब्ध झाल्यास ठाण्याचे लसीकरण अवघ्या १५ दिवसात पूर्ण होईल असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या लसीकरणात मागील काही दिवसापासून सावळा गोंधळ सुरु असल्याचे दिसत होते.

 

- Advertisement -

त्यामुळे हा गोंधळ कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ही पावले उचलण्यात आली आहेत. काही ठिकाणी लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टम अवलंबली जात होती. परंतु काही मंडळी आधीच टोकन घेऊन जात असल्याने त्याठिकाणी जे रांगेत उभे असायचे त्यांच्या हाती काही टोकन मिळत नव्हते. किंबुहना त्यांना लसीपासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ही टोकन पध्दत बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे या पाठीमागे असलेल्या राजकीय मंडळींना यामुळे मोठी चपराक बसली आहे. तर लसींच्या साठय़ानुसार केंद्रावर जेवढय़ा लस उपलब्ध असतील त्यानुसार जे रांगेत उभे असतील त्यांनाच टोकन दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दुसरीकडे कोणत्या लसीकरण केंद्रावर किती लस आहेत, त्याची माहिती आदल्यादिवशीच दिली जाणार आहे. यातही १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन पध्दतीनुसारच लसीकरण केले जाणार आहे.

तर ४५ वयोगटापुढील नागरीकांसाठी लसींच्या साठय़ानुसार प्रत्येक  केंद्रावर किती लस उपलब्ध आहेत, याची माहिती दिली आदल्या दिवशी दिली जाणार आहे. त्यानुसार रांगेत उभ्या राहणाऱ्या  तेवढय़ाच नागरीकांना लस दिली जाणार आहे.त्यातही सध्या तुटपुंज्या स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखाहून अधिक आहे. सध्या अवघे ३ लाखांच्या आसपास लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु लसींचा साठा योग्य प्रमाणात झाला किंवा ६० लाख लसी प्राप्त झाल्या तर अवघ्या १५ दिवसात लसीकरण मोहीम पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -