घरठाणेकल्याणमधील हजारे बंधूनी प्लाझ्मादानातून दिला सामाजिक संदेश

कल्याणमधील हजारे बंधूनी प्लाझ्मादानातून दिला सामाजिक संदेश

Subscribe

कोविड रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'प्लाझ्मा' मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. या कोविड- १९ चा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन कोरोना रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. त्यातच पुन्हा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यांना प्लाझ्माची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या अनुषंगाने कल्याणमधील तीन भावांनी प्लाझ्मादान करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. कल्याणमधील राहुल हजारे, जयदीप हजारे आणि केतन हजारे या हजारे बंधूंनी प्लाझ्मादानातून समाजाला संदेश दिला आहे. कल्याण डोंबिवलीत दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे.लसीकरण होत असले तरी, गेल्या महिन्याभरात तब्बल १५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘प्लाझ्मा’ मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. याशिवाय वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रक्तदान कमी होऊन ब्लडबँकांमधील रक्तसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्लाझ्मा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही भावना मनात ठेऊन समाजातील प्लाझ्मादान करण्यास पुढाकार घेणे गरजेचे आहे. हे प्लाझ्मादानाचे सामाजिक कार्य करण्यासाठी कल्याणमधील हजारे बंधूनी पुढाकार घेतला आहे.

यांच्यातील एॅड. जयदीप हजारे यांनी गेल्या वर्षी राबवलेल्या प्लाझ्मादानाच्या चळवळीमधून कोरोनाबाधितांना जीव वाचवण्यासाठी मदत झाली होती. गेल्या काही दिवसांतच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्लाझ्माचीही तितकीच गरज असणार आहे. आम्ही तिघांनी एकत्रितपणे प्लाझ्मादानाचा निर्णय घेतला , अशी माहिती एॅड. जयदीप हजारे यांनी एलएनएन यांना दिली.

- Advertisement -

‘या’ व्यक्तींचा प्लाझ्मा ठरतो उपयुक्त

कोरोना या  रोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात या विषाणूच्या विरोधात ‘अॅन्टीबॉडीझ’ तयार होतात. या अॅन्टीबॉडीझ माणसाच्या प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर रंगचा द्रव) तयार होत असतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना १४ दिवस विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येते. जर त्या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर त्यांचे रक्त प्लाझ्मा थेरपीसाठी घेतले जाते.


हेही वाचा :- नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने गृहमंत्रीपदाचा राजीनामा – अनिल देशमुख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -