घरठाणेमनसे पदाधिकारी जमील शेखच्या मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक युपीला रवाना

मनसे पदाधिकारी जमील शेखच्या मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक युपीला रवाना

Subscribe

४८ तासात मारेकऱ्यांना अटक करून निपक्षपातपणे या गुन्ह्याच्या तपास करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. 

मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेला आहे. दरम्यान गुन्हे शाखेने या प्रकरणी एकाला राबोडीतून अटक केली असून मारेकऱ्यांचा शोधासाठी गुन्हे शाखेचे एका पथक युपीला रवाना झाले आहे. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होऊन मुख्य सूत्रधार पोलिसाच्या हाती लागेल अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

ठाण्यातील राबोडी येथे राहणारे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी मारेकऱ्यांनी सोमवारी दुपारी भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. जमील शेखच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मारेकऱ्यांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. ४८ तासात मारेकऱ्यांना अटक करून निपक्षपातपणे या गुन्ह्याच्या तपास करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

- Advertisement -

त्यानंतर जमील शेख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन जमील शेख यांचा दफनविधी पार पडला. या गुन्हयाची गंभीरता संवेदशील तपास बघून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेच्या घटक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या हत्येसंबंधी पहिला संशयिताला राबोडी परिसातून अटक करण्यात आली.


ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात हत्या

वयवर्ष ३१ असणाऱ्या शाहिद शेख असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शाहिद हा चालक असून त्याच्या मोटारीतून मारेकऱ्यांना पळून जाण्यास मदत केली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान गुन्हे शाखेने ज्या मोटारीतून मारेकरी यांना पळून जाणाया मदत करण्यात आली ती मोटार देखील जप्त करण्यात आली आहे. जमील शेख यांच्यावर गोळी झाडणारे मारेकरी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली असून या मारेकऱ्यांचा शोधासाठी गुन्हे शाखेचे एक पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले आहे. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होऊन मुख्य सूत्रधार देखील हाती लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -