घरठाणेबंद असलेली कोविड सेंटर सुरु करा

बंद असलेली कोविड सेंटर सुरु करा

Subscribe

मनसेची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या मृत्यूती भर पडली आहे. ठाण्यातही कोरोना झपाट्याने वाढत आहे. ठाण्यातील खारेगाव येथे भूमिपुत्र मैदानात कोवीड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे ते सेंटर बंद करण्यात आले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरीदेखील ते कोरोना सेंटर बंदच आहे. त्यामुळे मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी हे कोवीड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर अनेक ठिकाणी कोवीड सेंटर उभे करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते कोवीड सेंटर बंद करण्यात आले. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

 

- Advertisement -

रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून त्यांचे हाल सुरू आहे. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, त्यामुळे सदर उपचार घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जागा मिळत नाही. यामुळे नागरिकांना व रुग्णांना उपचार करून घेण्यासाठी रुग्णालय मध्ये भरती होण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तरीदेखील पालिका प्रशासन याक़डे दुर्लक्ष का करते असा सवाल सुर्यराव यांनी उपस्थीत केला आहे. खारेगाव येथे भूमिपुत्र मैदानातील कोविड सेंटरच्या ठेकेदाराचे दी़ड कोटी थकबाकी आहे. म्हणून हे कोविड सेंटर बंद आहे. असा आरोप सुशांत सूर्यराव यांनी केला आहे. तर अजून त्यावर निर्णय झाला नसून वेळ पडल्यास ते सुरु करणार आहोत असे ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -