घरठाणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 35 गावांकडून निवेदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 35 गावांकडून निवेदन

Subscribe

डुबी रेती व्यवसायीकांचा यांत्रिकीकरणाला विरोध, पंधरा हजार आदिवासींवर भूकबळीचे संकट

मुंब्रा-रेतीबंदर आणि कशेळी ते घोडबंदर येथील गावांतील पारंपारिक डुबी रेतीच्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5 हजार ग्रामस्थ कुटुंब व जवळपास 15 कष्टकरी आदीवासी मजूर यांची उपजीविका नष्ट होईल आणि त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबावर भूकबळीचे गंभीर संकट ओढवेल, कुटुंब देशोधडीला लागतील, अशी वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितल्याची माहिती डुबी रेती व्यवसायीकांचे प्रतिनिधी दशरथदादा पाटील यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील पारंपारिक डुबी रेतीचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दशरथदादा पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मुंब्रा-रेतीबंदर आणि कशेळी ते घोडबंदर या ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्र पारंपारिकरित्या डुबी रेती व्यवसाय शेकडो वर्षांपासून करीत आहेत. आता या डुबी रेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांत्रिकीकरण केल्यास या डुबी व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5 हजार ग्रामस्थ कुटुंब आणि वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी या भागातुन येणारे, कुपोषित भागातील जवळपास 15 हजार कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका संपुष्टात येईल. या सर्वांच्या कुटुंबावर भूकबळीचे संकट ओढवेल. मुंब्रा आणि घोडबंदर खाडीतून पारंपारिक डुबी रेती व्यवसाय करणार्‍या 200 ते 300 टन रेतीने भरलेल्या बार्जेस घेऊन जात असतात. असे असताना खाडीतून खोली करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथल्या भूमिपुत्रांचा हा पारंपारिक व्यवसाय बंद केल्यास ते देशोधडीला लागतील. खरेतर पारंपारिक डुबी व्यवसायामुळे हजार कष्टकरी आदिवासींना आणि भूमिपुत्रांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन उपलब्ध आहे. यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी संबंधित आमदार, खासदार, मंत्री आणि डुबी व्यावसायिक यांची एकत्रित बैठक बोलवावी अशी विनंती दशरथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -