Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे स्टेमच्या 'एमडी' भरती घोटाळ्याची होणार चौकशी

स्टेमच्या ‘एमडी’ भरती घोटाळ्याची होणार चौकशी

Subscribe

 पाणीपुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

भिवंडी, मीरा-भाईंदर, ठाणे शहर व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘स्टेम’ प्राधिकरणातील मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) पदाच्या भरती घोटाळ्याची चौकशी आता सुरु झाली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना डावलून अपात्र व्यक्तीची नियुक्ती झाली असुन याप्रकरणी सखोल चौकशी करुन उचित कारवाई  करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव जयस्वाल यांनी ठाणे आयुक्तांना दिले आहेत. या बाबत तक्रार भूषण पाटील यांनी दिल्याने या कारवाईला गती मिळाली आहे.

एमडी या पदासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढण्यात आली. त्यानुसार ठाणे, मुंबईसह बुलढाणा, नवीमुंबई , सांगली, पुणे, कल्याण, सातारा अश्या विविध भागांतून २८ जणांचे अर्ज आले. स्टेम प्रशासनाच्या मनमानी कारभानाने व आर्थिक संगनमताने काही अपात्र उमेदवारांची नावे अर्जांची छाननी करताना घुसवण्यात आली व पाणीपुरवठा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात आली. अपात्र उमेदवाराला पात्र ठरवले नियुक्तीची ऑर्डरही काढली.

- Advertisement -

“मुख्य कार्यकारी अधिकारी” (व्यवस्थापकीय संचालक) पदाच्या जाहिरतीमधील अर्हता ‘ब’ नुसार शासकीय / निमशासकीय संस्थांमधील समतुल्य पद अथवा वर्ग – १ पेक्षा दर्जा कमी नसलेल्या अतिवरीष्ठ कार्यकारी स्तरावरील पद किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी /मोठया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील समतुल्य पदावर कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव अशी अट आहे. तसेच ‘क’ नुसार उमेदवार एम. बी. ए. (फायनान्स ) / पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी (एम. ई.) किंवा तत्सम अतिरीक्त अर्हता आणि पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील अनुभव असणा-या उमेदवार प्राधान्य देण्यात येईल अशी अट नमूद करण्यात आली होती.

परंतु संकेत घरत हे अर्हता ‘ब’  तसेच ‘क’ धारण (पूर्तता ) करीत नाही तरी देखिल नियमबाहय पध्दतीने “मुख्य कार्यकारी अधिकारी” (व्यवस्थापकीय संचालक) या पदावर त्यांना  नियुक्ती देण्यात आली. या मनमानीमुळे अन्य उमेदवारांवर अन्याय झाल्यामुळे भूषण पाटील यांनी घरत यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता यांची शहानिशा व सत्यता तपासुन तत्कालीन आयुक्त विपीन शर्मा यांनी संकेत घरत यांना दिलेले नियुक्तीचे आदेश रद्द करावे अशी तक्रार संबंधीत विभागांना केली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -