घरठाणेEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया; कारण...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया; कारण…

Subscribe

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली आणि  त्यानंतर लेझर ट्रिटमेंटद्वारे त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Surgery on Chief Minister Eknath Shinde What is the reason)

हेही वाचा – Uddhav Thackeray Vs BJP : आज शिवाजी महाराज हयात असते तर…; आव्हाडांचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला होता. त्यामुळे त्यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यानुसार, त्यांच्या डोळ्यावर आज सकाळी 9 वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. ठाणे शहरातील रुग्णालयात त्यांच्यावर लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

नातवाच्या वाढदिवसानंतर केली शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश यांचा गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवसस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुद्रांश याचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ठाण्यातील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray: मविआत जाणार का? राज ठाकरेंनी दिलेलं उत्तर चर्चेत

अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा, महिला, तरुण, अबालवृद्ध, शेतकरी, कामगार या सर्वांचा विचार करून तयार करण्यात आलेला आणि त्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत बदल न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागील दहा वर्षांमध्ये आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, गोदामांची अधिकाधिक व्यवस्था, आत्मनिर्भर तेलबिया अभियान, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच स्वत:च्या पायावर उभे राहता, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -