घरठाणेठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ; एका दिवसात ३२ जणांना लागण

ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ; एका दिवसात ३२ जणांना लागण

Subscribe

राज्यात (Maharashtra) एकिकडे कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus Patients) संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे स्वाइन फ्लूने (Swain flu) डोकं वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

राज्यात (Maharashtra) एकिकडे कोरोनाच्या रुग्णांच्या (Coronavirus Patients) संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे स्वाइन फ्लूने (Swain flu) डोकं वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत वाढत असलेला स्वाईन फ्लूचा धोका आता ठाण्यातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Swine flu patients increased in thane)

राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. गेल्या दिवसाची स्वाईन फ्लू रुग्णाची जी आकडेवारी समोर आलीये ती पाहून आरोग्य विभागही खडबडून जागे झाले आहे. कोरोना काळात जे निर्बंध पाळण्यात आले होते तेच निर्बंध आता हॅास्पिटलमध्ये पाळले जात असून हॅास्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची स्वाईन फ्लूची चाचणी केली जात आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे दुप्पट रुग्ण

गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे दुप्पट रुग्ण समोर आलेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून याकरता ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. शुक्रवार २९ जुलैपर्यंत ठाणे जिल्हयातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर सर्वात जास्त शहरी भागात दिसून येत आहे. ग्रामीण भागात अद्याप स्वाईन फ्लूचा फारसा शिरकाव झालेला नाही. ठाणे शहरापाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरात १८ स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत. त्यानंतर

नवी मुंबई शहरात स्वाईन फ्लूचे ११ रुग्ण आहेत तर मिरा भाईंदर शहरात नुकताच स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून तिथे २ रुग्ण आढळून आलेत. आणि २ इतर ठिकाणी. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ठाणे महापालिका हद्दीतच ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. पण, स्वाईन फ्लूची वाढती आकडेवारी पाहता तसच मंकीपॅाक्सचा धोका लक्षात घेता नागरिकांनी स्वतः हून काळजी घेणे गरजेचे आहे.


हेही वाचा –  ठाकरे कुटुंबातच फूट?; बिंदूमाधव ठाकरेंचा मुलगा निहार शिंदे गटाच्या पाठीशी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -