अतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्सवर कारवाई करा

प्रभागसमितीनिहाय अतिधोकादायक, धोकादायक इमारतीबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत उर्वरित अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

There is no injection of Chikungunya in Thane Municipal Hospital; The General Assembly revealed a shocking matter
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या दृष्टीने भुस्खलन होणाऱ्या ठिकाणांच्या नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.शहरात पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारतीं, नालेसफाई, भूसख्खन होणारी ठिकाणी तसेच पावसाळ्यासंबंधित इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी आदी उपस्थित होते.

प्रभागसमितीनिहाय अतिधोकादायक, धोकादायक इमारतीबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत उर्वरित अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच पावसाळ्यात देखील या सर्व इमारतीची पाहणी करून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा मानपाडा तसेच ठिकाणी पावसाळयात भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.याबैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरिकांना याची माहिती देण्याच्या सूचना देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. यावेळी अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेवून संपूर्ण यंत्रणा तयार ठेवण्याचे सूचना देखील त्यांनी दिल्या.