घर ठाणे आणखी दहा नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल

आणखी दहा नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल

Subscribe

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात १० नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. यातील पाच बसेस या तीन हात नाका ते गायमुख या मार्गांवर चालू या मार्गांवरील असलेली खाजगी बससेची मक्तेदारी मोडीत करण्याचे हे पाऊल उचलण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित पाच बसेसपैकी दोन बसेस या ठाणे ते बोरिवली,  दोन बसेस ठाणे स्टेशन ते वाशी चालविण्यात येणार आहे. तर एक बस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकारक व्हावा.याकरिता शिवाई नगर ते मुलुंड पूर्व या मार्गावर चालविण्याचे नियोजन परिवहन सेवेकडून करण्यात आले आहे.

त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ठाणेकर नागरिकांना लवकरच गारेगार प्रवास करता येणार आहे. मागील आठवड्यात गुरुवारी ऑगस्ट रोजी ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बारा मीटरच्या  इलेक्ट्रिक दहा बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसना सध्या आरटीओची परवानगी तसेच इतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर येत्या तीन दिवसात ठाण्यातील रस्त्यावर धावतील. विशेष म्हणजे या दहा बसेसपैकी पाच बसेस या तीन हात नाका ते गायमुख पर्यंत चालविण्यात येणार आहे. या मार्गांवरील प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेने  हे पाऊल उचलले आहे.परिणामी या निर्णयाने खाजगी बसेसची मक्तेदारी तर मोडीत निघेलच शिवाय प्रवाश्याना वातानुकुलीत बसेस मधून प्रवास करता येणार आहे. याबाबत बोलतांना ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी म्हणाले की आमच्या ताफ्यात बारा मीटरच्या दहा इलेक्ट्रिक बसेस मागील आठवड्यात दाखल झाल्या आहेत.त्यातील पाच बसेस या प्रवाश्यांची मागणी लक्षात घेता तीन हात नाका ते गायमुख अशा चालविण्यात येणार आहे. असे जोशी यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -