HomeठाणेThane : ठाणे जिल्ह्यात तापमान सरासरी १२ अंशावर

Thane : ठाणे जिल्ह्यात तापमान सरासरी १२ अंशावर

Subscribe

सोमवारी सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. बदलापूरमध्ये सर्वात कमी ११.३ तापमान नोंदवले गेले आहे.

ठाणे । मागील काही दिवसात वादळामुळे महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा तापमान घसरले आहे. ठाण्यात तापमानाचा पारा खाली आला असून सरासरी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
रविवारपासून तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सोमवारी सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. बदलापूरमध्ये सर्वात कमी ११.३ तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण भाग, बदलापूर परिसरात शेकोट्या पेटल्या.
फेंगल वादळामुळे काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमान वाढले होते. मागील दोन दिवसांत वादळाचा परिणाम कमी झाल्याने तापमानाचा पाराही घसरला आहे. डिसेंबर महिन्यातील आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद सोमवारी ११.३ अशी बदलापुरात झाली. तर थंड हवेचे ठिकाण माथेरानमध्ये तापमान ११.२ असे नोंदवले. पुढील काही दिवस अशीच थंडी ठाणे जिल्ह्यात कायम असण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील तापमान
ठाणे १४, नवी मुंबई १४, माथेरान ११.२, बदलापूर ११.३, अंबरनाथ १२.१, कल्याण १३.२, पनवेल १३.२, डोंबिवली १३.३

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -