सलग चार दिवस ठाण्यात पाणीबाणी

पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून ५० टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक झोनमध्ये त्यामुळे आजपासून सलग चार दिवसात किमान १२ ते २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. या मुख्य दुरुस्ती सोबतच, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्यूम एअर व्हॉल्व बसविणे, इंदिरानगर संपकडे नव्याने टाकण्यात आलेल्या ११६८ मी.मी. जलवाहिनीचे तीन हात नाका येथे मुख्य जलवाहिनीचू जोडणी करणे, तसेच, पाणी पुरवठ्यातील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामेही या चार दिवसात केली जाणार आहेत.

पाणी पुरवठ्याचे नियोजन
मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासात घोडबंदर रोड, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, रात्री ९ ते सकाळी ९ या काळात, गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील.

बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासात, सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, रात्री ९ ते सकाळी ९ या काळात, गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील.

गुरूवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सकाळी ९ या २४ तासात, इंदिरानगर, लोकमान्य नगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रुपादेवीपाडा, सावरकर नगर, डवलेनगर, आंबेवाडी, परेरा नगर, झांजेनगर, साठे नगर, कैलासनगर, भटवाडी या भागात पाणी पुरवठा बंद राहील.
तर, सकाळी ९ त रात्री ९ या बारा तासांसाठी, सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

तसेच, रात्री ९ ते. सकाळी ९ या बारा तासांसाठी, घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

शुक्रवारी, २४ फेब्रुवारी रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ या काळात सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील.तसेच, रात्री ९ ते सकाळी ९ या बारा तासांसाठी, घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील. या शट डाऊनंतर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक-दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.