घरठाणेकोकणातील ते दोन मंत्री कोण ?

कोकणातील ते दोन मंत्री कोण ?

Subscribe

रेंटलच्या इमारत घोटाळ्यांचे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न-ठाणे कॉंग्रेसचा आरोप

मुंब्रा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सर्व्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करीत केवळ कोकणातील दोन मंत्र्यांमुळे या तपासात विघ्न येत असल्याचा धक्कादायक आरोप यावेळी कॉंग्रेसचे शहराअध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला गुरुवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच पालिकेतील तीन पदाधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असल्याने या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.परंतु ही कारवाई न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी मुक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.

एमएमआरडीएच्या घरांच्या बाबत पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.परंतु हे प्रकरण पुढे वायू नये या उद्देशाने पोलिसांवर दबाव आणला जात असून हे प्रकरण गुलदस्त्यात टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.वास्तविक पाहता हे प्रकरण पुढे वाढू नये यासाठी कोकणातील दोन मंत्री पोलिसांवर दबाव आणत असून पालिकेतील तीन अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खोटी दस्ताऐवज तयार करुन २० लाखांना येथील फ्लॅट विकण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यात पालिकेतील त्या तीन पदाधिकाऱ्यांना थेट मजल्यावरील पूर्ण फ्ॅलट दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

- Advertisement -

या संदर्भात आपण पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे. तसेच राज्य शासनाकडे देखील या प्रकरणी न्याय मागितला जाणार आहे. यापुढेही जाऊन दाद न दिल्यास न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. परंतु या प्रकरणाचा योग्य न्याय निवाडा झाला नाही, दोषींवर कारवाई झाली नाही तर मात्र येत्या २६ जानेवारी रोजी मुक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

मुंब्रा असेल किंवा इतर ठिकाणी अशाच प्रकारे विकासकांनी रेंटलच्या इमारती उभ्या केल्या आहेत. परंतु आजच्या घडीला त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सुमारे १५ हजार कुटुंबे यात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.मात्र ही या इमारती मुळातच निकृष्ठ दर्जाच्या उभारण्यात आल्या असून त्याकडे पालिकेतील अधिकारी,काही लोकप्रतिनिधी यांनी जाणून बूजून दुर्लक्ष केल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.त्यातही आधी रेंटलच्या इमारती पूर्ण करुन मग ओसी देणो अपेक्षित असतांना आधी विकासकांनी बांधलेल्या कर्मशील इमारतींना ओसी दिल्या जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,प्रदेश सदस्य राम भोसले,शहर काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष संदिप शिंदे,प्रसाद पाटील,रविंद्र कोळी आदीं पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -