घरठाणेठाण्यात तलवारीच्या धाकावर दुकानदारांकडून हप्ता वसूली

ठाण्यात तलवारीच्या धाकावर दुकानदारांकडून हप्ता वसूली

Subscribe

ठाण्यातील वर्तक नगर, लोकमान्य नगर परिसरात सुनील गवळी उर्फ कोड्या या गुंडाने आपली दहशत निर्माण केली असून तलवार, चॉपरच्या धाकावर तो येथील दुकानदार फेरीवाल्याकडून मोठ्या रकमा हप्ताच्या नावाखाली बळजबरीने वसूल करीत आहे. सुनील उर्फ कोड्याच्या दहशतीला कंटाळून अखेर एका रियल इस्टेट एजंटने धाडस दाखवून वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सुनील हणमंत गवळी उर्फ कोड्या हा लोकमान्य नगर पाडा क्रमांक ४ येथे राहणारा आहे. सुनील उर्फ कोड्या हा सराईत गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, कोड्याने लोकमान्य नगर, वर्तक नगर परिसरात स्वतःची दहशत निर्माण केली आहे. तलवार,चॉपरच्या धाक दाखवून येथील फेरीवाले आणि दुकानदारांकडून बळजबरीने हप्ता वसुली करीत असतो. मागील काही वर्षांपासून कोड्याने आपली दहशत निर्माण केली असून येथील फेरीवाले तसेच दुकानदार कोड्याच्या दहशतीला कंटाळले आहे. त्याच्या दहशतीमुळे पोलिसात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यामुळे कोड्याला पोलिसांची भीती उरलेली नाही.कोड्याच्या दहशतीला कंटाळलेल्या एका रियल इस्टेट एजंटने धाडस करून वर्तक नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

रियल इस्टेट एजंट याच्या तकरीवरून वर्तक नगर पोलिसांनी सुनील उर्फ कोड्या याच्याविरुद्ध खंडणी, मारामारी, धमकी देणे, घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -