महानिर्माल्‍य अभियानाची तपपूर्ती; ठाण्यात दीड दिवसाच्‍या विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित

कृत्रिम तलावाचा प्रयोग ठाण्‍याचे महाराष्‍ट्राला दिला, त्‍याचसोबत तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने गणपती काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापनासाठी देखील गेल्‍या बारा वर्षांपासून महानिर्माल्‍य व्‍यवस्‍थापन अभियान राबविले आहे.

thane Mahanirmalya campaign 10 tons Nirmalya collected in thane one and half day ganesh visarjan

ठाणे: समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले असून, यंदा दीड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. तर थर्माकोल व प्‍लास्‍टिकचा वापर ९५ टक्‍के कमी झालेला यावर्षी दिसून आला आहे.

कृत्रिम तलावाचा प्रयोग ठाण्‍याचे महाराष्‍ट्राला दिला, त्‍याचसोबत तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने गणपती काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापनासाठी देखील गेल्‍या बारा वर्षांपासून महानिर्माल्‍य व्‍यवस्‍थापन अभियान राबविले आहे. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक व कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य व सजावटीचे साहित्‍य संकलित केले जाते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते. वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातुन खत निर्मिती केली जाते, तर अजैविक कचऱ्यात असलेल्‍या प्‍लास्‍टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुनर्निर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात.

गेल्‍या १२ वर्षापासून समर्थ भारत व्‍यासपीठ हा उपक्रम राबवित आहे. शहरातील सफाई सेवक महिला व संस्‍थेचे कार्यकर्ते गणेशोत्‍सव अधिक पर्यावरण पुरक व्‍हावा यासाठी जन जागृती करत असतांनाच प्रत्‍यक्ष निर्माल्‍य संकलन व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लागावी म्‍हणून एक महिना या महानिर्माल्‍य अभियानात कार्यरत असतात. दिड दिवसाच्‍या विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्‍सव मोठया उत्‍साहात साजरा होत आहे. त्‍यामुळे निर्मालयाचे प्रमाण यंदा वाढले आहे. थर्माकोल व प्‍लास्‍टीकचा वापर ९५ टक्‍के कमी झालेला यावर्षी दिसला अशी माहिती संस्‍थेच्‍यावतीने देण्‍यात आली. संपुर्ण गणेशोत्‍सवात किमान १०० टन निर्माल्‍य संकलित होईल असा अंदाज संस्‍थेच्‍यावतीने व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. त्‍याचे देखील शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावली जाईल असा निर्धार समर्थ भारत व्‍यासपीठाने व्‍यक्‍त केला आहे.


भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमध्ये कोणताही बिघड नाही; बोईंग इंडियाचे स्पष्टीकरण