घरठाणेठाण्यात यादव कुटुंबीयांवर काळाचा घाला, दरड कोसळून पाच जण ठार

ठाण्यात यादव कुटुंबीयांवर काळाचा घाला, दरड कोसळून पाच जण ठार

Subscribe

मुंबईतील मुसळधार पावसातील बळींचे सत्र सुरुच असून या पावसाने आत्तापर्यंत ३० नागरिकांचा बळी घेतला आहे. यात आज ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर दरड कोसळून पुन्हा ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील चर्च रोडवरील घोलाई नगर परिसरातील दुर्गा चाळीत ही घटना घडली आहे.दरड कोसळल्य़ाने चार घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर शेजाऱ्यांनी धाव घेत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्य़ासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र तोपर्यंत ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. दुर्देवाची बाब म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि त्यांची १२ वर्षांचा मुलगा, १० वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षीय मुलगी यांचा दुर्देवी अंत झाला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील १८ वर्षीय मुलगा आणि त्याची पाच वर्षीय बहीण बचावली आहे. या घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, TDRF आणि NDRF, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन नागरिकांना सुखरुप बाहेर काढले आले आहे. मात्र अद्याप ७ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचे शोधकार्य सुरु आहे.

- Advertisement -

ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या नागरिकांची नावे

१) प्रिती यादव ( मुलगी, वय ०५ वर्ष)
२) अचल यादव ( मुलगा, वय १८ वर्ष)

- Advertisement -

शनिवारी रात्री पासून बरसत असलेल्या पावसाचा फटका अखेर ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवसभरात १३३.०७ मीमी पावसाची नोंद झाली असतांनाच दुपारी कळव्यातील घोलाई नगर भागातील दुर्गा चाळ या भागात दुपारी १२.३० च्या सुमारास दरड कोसळली आणि त्यात एकाच कुटुंबातील सात जण ढिगाऱ्याखाली अडकले. जवळ जवळ चार तास बचावकार्य सुरु होते. डोंगराच्या वरील बाजूवरील दरड वेगाने खाली घरावर पडल्याने पावसात हे बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यु झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

ठाण्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत असून आत्तापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. आज झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये ३ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नावे

१) प्रभू सुदाम यादव ( पुरुष, वय ४५ वर्षे)
२) विधवंती देवी प्रभू यादव ( महिला, वय ४० वर्षे )
३) रविकिशन यादव (मुलगा, वय १२ वर्षे)
४) सिमरन यादव (मुलगी, वय १० वर्षे)
५) संध्या यादव ( मुलगी, ०३ वर्षे)

१५० कुटुंबाना शाळेत हलविले

येथील डोंगरावर वर पासून खाल र्पयत घरे आहेत, परंतु आता दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील तब्बल १५० कुटुंबांना घोलाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -