खवय्यांसाठी खुशखबर! आता मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये खाता येणार

राज्य शासनाने हॉटेल्स सुरु करण्याचे धोरण आखले आहे. त्याानुसार ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे हॉटेल आता खवय्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाायझेशन आणि ग्राहकांच्या नोंदी ठेवून दर्दी खवय्यांसाठी हे हॉटेल सुरु करण्यात आले असल्याचे हॉटेलचे चालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांनी दिली. तिखट, झणझणीत मिसळ खाण्यासाठी सबंध जिल्ह्याभरातील दर्दी खवय्ये या तहसील कार्यालयााबाहेरील कॅण्टीनमध्ये येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने हे हॉटेल बंद होते. तर, गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये मिसळ पार्सल स्वरुपात दिली जात होती. मात्र, सायंकाळी सहा-साडे सहा वाजताच हे हॉटेल बंद करण्यात येत असल्याने खवय्यांचा हिरमोड होत होता.

लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करुन या हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळता यावे, या उद्देशाने रचनेमध्ये बदल करुन हॉटेल सुरु केले आहे. तसेच, या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खवय्यांच्या नाव-पत्त्याची नोंद केली जात आहे. जेणेकरुन एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे सोपे होणार आहे.

तसेच, हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टेम्परेचर तपासणी, ऑक्सीजन पातळीची तपासणी, सॅनिटायझेशन आदी सोपस्कार केले जात आहेत. शिवाय, एखादा खवय्या उठून गेल्यानंतर टेबल खुर्ची पुन्हा सॅनिटाईज केली जात आहे, असेही मुर्डेश्वर यांनी सांगितले.  दरम्यान, अनेक खवय्यांनी मिसळ येथेच बसून खाण्यात मजा आहे; पार्सलला महत्व नाही, असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यात रेस्टॉरंट्स, बार उघडण्याच्या नवीन वेळा जाहीर

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्यासंदर्भात नवीन शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार कोणत्या वेळेत उघडावेत आणि बंद करावेत, यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. नवीन शासन आदेशांनुसार राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सकाळी ८ वाजता उघडण्याची तर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री बरोबर १० वाजता हे बंद व्हायला हवेत असे देखील या शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी जरी हा निर्णय जाहीर केला असला, तरी संबंधित महानगर पालिका किंवा जिल्हा प्रशासन यासंदर्भात वेगळा निर्णय घेऊन वेळेसंदर्भात वेगळे निर्देश देऊ शकतात, असे देखील या आदेशात म्हटले आहे.


डबेवाल्यांसाठी ‘लोकल’चे दरवाजे झाले खुले; राज्य सरकारासह रेल्वे प्रशासनाचे मानले आभार