घरठाणेठाण्याचा पारा सलग दुस-या दिवशी ४० अंशावर

ठाण्याचा पारा सलग दुस-या दिवशी ४० अंशावर

Subscribe

पहिल्या चार दिवसात तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा ४० अंशावर गेला आहे. त्यातच पहिल्या चार दिवसात तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. या वाढलेल्या पाऱ्याने ठाणेकर नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तसेच घशाला कोरड पडू लागल्याने थंड पाण्याबरोबर शीत पेयांकडे नागरिक वळत आहेत.

या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशाच्या आसपास पोहोचला होता. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत या तापमानाने ३८ अंशाचा पल्ला पार केला होता. हीच परिस्थिती मार्च महिन्यात कायम आहे. यंदाच्या वर्षी उष्मात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्याची सुरुवात झाली असून सोमवार- मंगळवारी ठाण्याचे तापमान ३९ अंश सेल्सीअसवर गेले होते. त्यानंतर बुधवार – गुरुवारी हे तापमान एक अंशाने वाढले. सलग दोन ठाण्याचे तापमान हे ४० अंश सेल्सिअस दर्शविण्यात येऊ लागले. त्यामुळे वातावरणात सकाळ पासूनच उष्मा जाणवत होता. दुपारी त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले. दिवसभरातील तापमानाचा फटका रात्रीच्या वेळीही जाणवताना दिसत आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढताना दिसत आहे. १०० ते १५० वरून रुग्णांची संख्या २०० ते २५० वर जात आहे. या वाढत्या रुग्ण संख्येवरून घर बाहेर पडणे जोखमीचे झाले आहे. त्यातच तापमानाचा पारा चढल्याने घरी बसणाऱ्यांनाही नकोसे झाले. त्यातच बाहेर आल्यावर तळपणा-या सूर्यामुळे दुपारी त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारी बाहेर पडू नये. तसेच बाहेर जाताना छत्री, डोक्यावर टोपी परिधान करावी आणि जास्तीतजास्त पाणी पिण्यावर भर द्यावा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -