घरठाणेठाण्यातील आमदार-खासदार कोरोना पॉझिटिव्ह

ठाण्यातील आमदार-खासदार कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

 शिंदे यांच्या पाठोपाठ खासदार विचारे आणि आमदार सरनाईकही कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे आणि ओवळा माजीवडा  विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब पुढे आली आहे. खासदार विचारे यांच्यावर घरीच आणि आमदार सरनाईक यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. एकाच दिवशी तिघे पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहर हादरले आहे.

सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समवेत विचारे हे देखील न्हावा शिवा येथे पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पालकमंत्री शिंदे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावर विचारे यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. कोरोना काळात मागील दोन वर्षापासून विविध प्रकारे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या संपर्कात असून देखील आई जगदंबेच्या आर्शीवादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी केली असता माझी टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. मी ठीक आहे, काळजी नसावी परंतु मी कोरोना पॉझीटीव्ह झाल्याने मागील दोन ते तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी व आपली तसेच परिवाराची काळजी घ्यावी.

- Advertisement -

आपल्या सदीच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातून लवकर बाहेर पडेन असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे ओवळा – माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सरनाईक हे देखील कोरोना बाधीत झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता,ती पॉझीटीव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करुन घ्यावी तसेच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. सरनाईक यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -