घरठाणेठाणे पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्यांची होणार गर्दीतून मुक्तता, नव्या पूलाच्या कामास सुरुवात

ठाणे पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्यांची होणार गर्दीतून मुक्तता, नव्या पूलाच्या कामास सुरुवात

Subscribe

ठाणे महापालिका उभारणार नवा पूल

ठाणे शहरात विकासकामांनी जोर धरला आहे. ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहेत. तसेच जुने व जीर्ण झालेले पादचारी पुल तोडून नव्याने बांधण्यात येत आहेत. ठाणे स्टेशनवर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पुल जीर्ण झाला आहे. या पूलावर दररोज गर्दी असते. हा पूल सोयीस्कर आणि सॅटिसला जोडला असल्याने पूलावर नागरिकांची गर्दी असते. सदर पूल हा चिंचोळ्या प्रकारचा असल्याने २ माणसांना नीट या पूलावरुन चालता येत नाही. त्यात सायंकाळच्या वेळेत पूलावरील रहदारी जास्त असल्याचे नागरिकांची कोंडी होते. या पूलाला पर्यायी पूल म्हणून नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.

आनंद सिनेमाजवळ असलेला पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी नवा ५ मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. या पूलाचे कामकाजही सुरु करण्यात येणार आहे. जूना पूल लवकरच तोडण्यात येणार आहे. या नव्या पूलासाठी आठ कोटींचा खर्च येणार आहे. हा पूल ठाणे महापालिका रेल्वेच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहे. ठाण्यातील ९० टक्के नागरिक या पुलाचा वापर करतात त्यामुळे या पूलावर प्रचंड गर्दी होते. त्यातच फेरीवाले या पूलावर विक्रीसाठी बसतात त्यामुळे या पूलावर गर्दीतून वाट काढत जावे लागते.

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवा पूल बांधण्यात येत असल्यामुळे नागरिकांना आता मोकळेपणाने चालता येईल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक नवे पूल बांधण्यात आले आहेत. परंतू या पूलाचा वापर अधिक होत आहे. कोपरीला पादचारी पूलाचे कामही वेगाने सुरु असल्यामुळे येत्या २ वर्षात हे दोन्ही पूल पादचाऱ्यांच्या सेवेत खुले करण्यात येण्याची शक्यता आहे. नवा पूल बांधण्यासाठी जूना पूल लवकरच तोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवा पूल तयार होऊन सेवेत रुजू होईपर्यंत नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -