घरठाणेस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त ठाणे महापालिकेची शहरातल्या वास्तुंवर तिरंगी रोषणाई

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त ठाणे महापालिकेची शहरातल्या वास्तुंवर तिरंगी रोषणाई

Subscribe

ठाणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलेल्या नागरिकांच्या उत्साहास प्रतिसाद देत ठाणे महापालिकेने शहरातील विविध वास्तुंवर तिरंगी रोषणाई केली आहे. त्यांना नागरिकांनी आनंद घ्यावा आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दुप्पट करावा, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.

- Advertisement -

घरोगरी तिरंगा उपक्रमाच्या पूर्वसंध्येला डॉ. शर्मा यांनी शहरातील विविध इमारतींच्या रोषनाईची पाहणी केली. मासुंदा तलाव परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, गांधी उद्यान, दादोजी कोंडदेव मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवन, महापालिका मुख्यालय, आनंदनगर पादचारी पूल, काशिनाथ घाणेकर सभागृह आदी ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

या पाहणीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, उपनगर अभियंता शुभांगी केशवानी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -