Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाणे महापालिका चषक राष्ट्रीय छायाचित्र पारितोषिके जाहीर

ठाणे महापालिका चषक राष्ट्रीय छायाचित्र पारितोषिके जाहीर

Subscribe

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर अपूर्व सलकडे (आउटलूक) यांना वृत्त विभागातील पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. तर, दैनदिन जीवन या विभागात मोनी शर्मा (एएफपी) यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. तसेच, लॅण्डस्केप विभागात लाझरस पॉल (मुक्त छायाचित्रकार) यांना पहिले पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार, २० ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.
कोरोना नंतर ठाणे शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन यांचे आयोजन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरुन एकूण ३१९६ प्रवेशिका आल्या. त्यातून सुमारे १४००० छायाचित्रेत स्पर्धेत सहभागी झाली. या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकार आणि पद्मश्री सन्मान प्राप्त पाब्लो बार्थोलोमिव्ह, अतुल लोके, विकास खोत, प्रकाश रसाळ, केदार भट, सतीश नांदगावकर यांनी परिक्षण केले.

परीक्षकांनी निवडले विजेत स्पर्धक आणि इतर निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे स्मारक, सेवा रस्ता, तीन हात नाका येथे मांडण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला प्रसिद्ध छायाचित्रकार नयन खानोलकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आदी मान्यवरांनी  भेट दिली. ठाणे शहारातील विविध शाळामधील विद्यार्थ्यांनीही हे प्रदर्शन पाहिले. रसिकांसाठी हे प्रदर्शन रविवार सायंकाळपर्यंत विनामूल्य खुले आहे.

- Advertisement -

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
राष्ट्रीय स्तर (विषय – वृत्त छायाचित्र)
प्रथम क्रमांक – अपूर्व सलकडे, आऊटलूक, मुंबई
दुसरा क्रमांक – विनय गुप्ता, मुक्त छायाचित्रकार, गुरगाव
तिसरा क्रमांक – प्रशांत खरोटे, लोकमत, नाशिक
उत्तेजनार्थ १ – अनिंद्य चटोपाध्याय, टाइम्स ऑफ इंडिया, दिल्ली
उत्तेजनार्थ २ – बिस्वरंजन रौत, एपी, ओडिशा
राष्ट्रीय स्तर (विषय – दैनदिन जीवन)
प्रथम क्रमांक – मोनी शर्मा, एएफपी
दुसरा क्रमांक – रजनीश काकडे, एपी, मुंबई
तिसरा क्रमांक -मनोज मुसळे
उत्तेजनार्थ १ – मंवेंदर वशिष्ठ लव, पीटीआय
उत्तेजनार्थ २ – आशिष राणे, मिड डे, मुंबई.
राष्ट्रीय स्तर (विषय – लॅण्डस्केप)
प्रथम क्रमांक – लाझरस पॉल, मुक्त छायाचित्रकार, नवी मुंबई
दुसरा क्रमांक – आशिष राजे, मिड डे, मुंबई
तिसरा क्रमांक -सतेज शरद शिंदे, मिड डे, मुंबई
उत्तेजनार्थ १ – अंकुर जयवंत तांबडे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
उत्तेजनार्थ २ – प्रतीक चोरगे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
राष्ट्रीय स्तर (विषय – एरियल फोटोग्राफी)
प्रथम क्रमांक – प्रतीक चोरगे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
दुसरा क्रमांक – नरेंद्र वासकर, इंडियन एक्स्प्रेस, मुंबई
तिसरा क्रमांक – शंतनु दास, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
उत्तेजनार्थ १ -अक्षय प्रकाश कानडे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
उत्तेजनार्थ २ – अक्षय प्रकाश कानडे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
राज्य स्तरीय (विषय – स्मार्ट सिटी)
प्रथम क्रमांक – आशिष राणे, मिड डे, मुंबई
दुसरा क्रमांक – आशिष राजे, मिड डे, मुंबई
तिसरा क्रमांक – नंदू कुरणे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
उत्तेजनार्थ १ – हिमांशू मिस्त्री, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
उत्तेजनार्थ २ – लाझरस पॉल, मुक्त छायाचित्रकार, नवी मुंबई
राज्यस्तरीय (विषय – उत्सव/सण)
प्रथम क्रमांक – शिवाजी धुते, मुक्त छायाचित्रकार, तुळजापूर
दुसरा क्रमांक – राहुल गोडसे, मुक्त छायाचित्रकार, पंढरपूर
तिसरा क्रमांक – आशिष राजे, मिड डे, मुंबई
उत्तेजनार्थ १ – आशिष राजे, मिड डे, मुंबई
उत्तेजनार्थ २ – गणेश नामदेव मेमाणे, मुक्त छायाचित्रकार, मुंबई
राज्य स्तरीय (विषय – मोबाईल फोटो- विषय- पावसाळा)
प्रथम क्रमांक – आदित्य वायकुळ, टाइम्स ऑफ इंडिया, पुणे
दुसरा क्रमांक – शरद पाटील, मुक्त छायाचित्रकार, कोल्हापूर
तिसरा क्रमांक – गुरुदास बाटे, मुंबई
उत्तेजनार्थ १ – अतुल कांबळे, मिड डे, मुंबई
उत्तेजनार्थ २ – हनीफ तडवी, मुंबई
जिल्हा स्तरीय (विषय – बदलते ठाणे)
प्रथम क्रमांक – मनोज सिंग
दुसरा क्रमांक – सचिन देशमाने
तिसरा क्रमांक – गणेश जाधव
उत्तेजनार्थ१ – दीपक कुरकुंडे
उत्तेजनार्थ २ – शिवाजी देसाई

मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी खुली होणार – रवींद्र चव्हाण
गेल्या १२ वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनंत अडचणी आल्या. वनखात्याची परवानगी, कोर्ट कचेरी, दावे या सर्व गोष्टींना आता पुर्ण विराम मि‌ळाला असून या कामाला आता गती आली आहे. कोणत्याही परिस्थितीतमुंबई-गोवा महामार्गावरील नऊ मीटरची एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी वाहतूकीसाठी खुली होईल आणि दुसरी मार्गिका डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुर्ण करून वाहतूकीसाठी खुली केली जाईल. या रस्त्यावरील यंत्रणेला काम करताना त्रास होऊ नये, म्हणून आंदोलन करू नये, अशी विनंती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -