घरठाणेठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक एकमेकांना भिडले; भररस्त्यात एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ

ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक एकमेकांना भिडले; भररस्त्यात एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ

Subscribe

ठाणे: ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक आपसात भेडल्याचा व्हिडिओ सध्या चांगला व्हायरल झाला असून शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांचे कसे धुणी काढताना दिसत आहेत. यावेळी या माजी नगरसेवकांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच एका महिला नगरसेविकेने चक्क पायातील पायतान काढून उगारल्याचे दिसत आहे. हा प्रकार भररस्त्यात घडल्याने माजी नगरसेवकांचा वादविवाद चव्हाट्यावर आला आहे.

हा वाद माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता जाधव-भोसले या पालकमंत्री गटाविरुद्ध माजी नगरसेविका नम्रता राजेंद्र फाटक या आमदार रविंद्र फाटक यांच्या गटात झाला. प्रभागातील कामांचे श्रेयावरून हा वाद झाल्याचे तरी या व्हिडीओ मध्ये पाहण्यास मिळत आहे. याचदरम्यान त्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी चक्क एकमेकांची ‘लायकी’ ही काढल्याचा प्रकार समोर आहे.

- Advertisement -

याबाबत प्रतिउत्तर देताना, गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा प्रकार चार दिवसांपूर्वीचा होता असे सांगितले आहे. तसेच हा व्हिडिओ जाणूनबुजून व्हायरल करत शिवसेनेची बदनामी करण्याचा प्रकार आहे. याबाबत आपण पालकमंत्र्यांच्या तसेच आमदार रविंद्र फाटक यांच्या कानावर घातलेला आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

बाळासाहेबांची शिकवण आहे, कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घ्यायचे. त्यामुळे मी कट्टर शिवसैनिक असल्याने मी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यातच मला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्याचबरोबर या प्रकाराचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व व्हिडीओ माझ्याकडे आहेत असा दावाही रेपाळे यांनी केला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -