घरठाणेठाणे पोलीस आयुक्तालय इमारतीच्या लिफ्टमध्ये बिघाड, 7 जण अडकले

ठाणे पोलीस आयुक्तालय इमारतीच्या लिफ्टमध्ये बिघाड, 7 जण अडकले

Subscribe

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अचानक बिघाड झाल्याने सात जण अडक्याची घटना घडली होती. दुसऱ्या मजल्यावर ही लिफ्ट अचानक बंद पडली, या घटनेमुळे लिफ्टमधील प्रवाश्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र काही मिनिटांत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. यातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. ही घटना सोमवारी सकाळी 11.18 मिनिटांच्या सुमारास घडली आहे.

ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची तळ अधिक सात मजली इमारत आहे. या इमारतीची लिफ्ट सोमवारी दुसऱ्या मजल्यावर येताच बंद पडली, काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही लिफ्टमध्येच अडकून पडली. यावेळी लिफ्टमध्ये सात प्रवासी होते.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही मिनिटातच लिफ्टमध्ये अडकलेल्या सात ही जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी मेकॅनिकलच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली. लिफ्टच्या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -