HomeठाणेThane : ठाण्यातील पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

Thane : ठाण्यातील पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

Subscribe

नववर्ष स्वागताला कडक पोलीस बंदोबस्त

ठाणे । दरवर्षी वर्षाच्या अखेरचा डिसेंबर महिना सुरु झाला कि वेध लागते ते नवर्षाच्या पार्ट्यांचे त्यानुसार प्लॅनिंग सुरू होते. काही जण घरातच कुटुंबिय किवा मित्र-मैत्रिणींसह सेलिब्रेशनचा प्लान करतात तर काही जण हॉटेल रिसॉर्टमध्ये जाऊन नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवतात. तर काही जण मद्यपान पार्टीचे नियोजन करतात. मद्यपानामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यामुळे दरवर्षी सारखे यावर्षी देखील मद्यपींवरती नजर ठेवण्याकरता ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत. तर येऊर जंगल परिसरामध्ये पार्ट्यामुळे शांतता भंग होते तसेच नाईट पार्ट्या मोठ्या प्रमाणात होतात, याकडे देखील पोलिसांची करडी नजर आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरता काही परिसरात मंडळे, सोसायट्या संगीत तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घेतात. पण तरुण, तरुणी वर्ग आता जास्त प्रमाणात नाईट पार्ट्याकडे वळत चालला असल्याने या पार्ट्यामध्ये नशेडी पदार्थांचे सेवन देखील मोठ्या प्रमाणात होतात. यामुळे अशा पार्ट्याना वेळीच बंद करण्याकरिता तसेच कारवाई करण्याकरिता ठाणे पोलीस सतर्क झाले आहेत.

मद्यपानामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला अनेक दुर्घटना, अपघात होत असतात. हेच टाळण्यासाठी आता ठाण्यात देखील हॉटेल असोसिएशनने ३१ डिसेंबरच्या फुल नाईट पार्टीसाठी आराखडा आखत प्लानिंग केले आहे. त्याचीच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे ३१ डिसेंबरला ४ पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही. हे वाचून अनेकांना झटका बसला असेल, पण हे खरं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करताना लोकांना संपूर्ण रात्र पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र ३१ डिसेंबरच्या फुल नाईट पार्टी दरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी हॉटेल असोसिएशनने आराखडा तयार केला आहे. यामुळे हॉटेल असोसिएशनने ग्राहकांना चार मोठे पेग दिल्यानंतर दारु न पिण्याचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ग्राहकांनी पार्टी दरम्यान दारूच्या नशेत असताना किंवा पार्टीवरून घरी परतताना कोणतीही चूक करू नये.

३१ डिसेंबरच्या रात्री अनेक लोक दारू पिऊन सेलिब्रेशन करतात, मात्र आता हॉटेलमध्ये त्यांना ४ पेक्षा जास्त पेग मिळणार नाहीत. तसेच कोणताही अपघात अथवा दुर्घटना होऊ नये या कारणास्तव, असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्रं तपासण्याची आणि मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजना आखली आहे. यामुळे अनेक दुर्घटना टळू शकतात. यामुळे आता मद्यपी तळीरामावर्ती ३१ डिसेंबरच्या रात्री किती कारवाई होते हे देखील पोलीस बंदोबस्तामध्ये समोर येणार आहे. कारण नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

३१ डिसेंबर रात्री बंदोबस्ताकरता ३५ पोलीस अधिकारी आणि तेवढ्याच संख्येने पोलीस पथके असणार आहेत. प्रत्येक पोलिसांच्या टीमसाठी एक अधिकारी नेतृत्व करणार आहे. एक अधिकारी आणि तीन पोलीस एका टीममध्ये असणार आहेत. तसेच ५१ ब्रेथ अनालायझर मशिन्स उपयोगात आणल्या जाणार्‍या आहेत.
– पंकज शिरसाठ, उपायुक्त वाहतूक पोलीस ठाणे